भेटा देशातील 5 व्या सर्वात श्रीमंत महिलेला, जिच्याकडे आहे 28 हजार कोटींची संपत्ती, तरीही प्रसिद्धीपासून दूर आहेत त्या


देशातील महिला आज प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रगती करत आहेत. मग ते शिक्षण क्षेत्र असो वा क्रीडा क्षेत्र. आज प्रत्येक क्षेत्रात महिलांचे वर्चस्व आहे. व्यवसायाच्या क्षेत्रातही महिला आश्चर्यकारक कामगिरी करत आहेत. आज देशातील अनेक महिलांनी व्यवसायाच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयांची संपत्ती निर्माण केली आहे. पण आज आपण एका यशस्वी महिलेबद्दल बोलणार आहोत जिने आपल्या मेहनतीने हजारो कोटी रुपयांचे साम्राज्य उभे केले आहे. आज त्यांच्या कंपनीत शेकडो लोक काम करतात, त्यामुळे लोकांच्या घराचा खर्च चालतो.

खरं तर, आपण ज्या अब्जाधीश महिलेबद्दल बोलणार त्या आहेत लीना तिवारी. आज लीना तिवारी यांची गणना देशातील पाचव्या क्रमांकाची श्रीमंत महिला म्हणून केली जाते. पण असे असूनही, फार कमी लोकांना त्यांच्याबद्दल माहिती आहे, कारण लीना नेहमीच मीडियाच्या चकाकी आणि बातम्यांपासून दूर राहतात. सध्या लीना तिवारी या फार्मा कंपनी यूएसव्ही इंडियाच्या अध्यक्षा आहेत.

फोर्ब्सने यावर्षी एप्रिल महिन्यात भारतातील सर्वात श्रीमंत महिलांची यादी जाहीर केली. या यादीत फोर्ब्सने लीना तिवारी यांना पाचव्या स्थानावर ठेवले होते. यूएसव्ही इंडिया या फार्मा कंपनीचा पाया त्यांचे दिवंगत वडील विठ्ठल तिवारी यांनी 1961 साली घातला होता. या कामात रेव्हलॉनने वडिलांना साथ दिली होती. सध्या लीना तिवारी 65 वर्षांच्या आहेत. 2022 मध्ये, फोर्ब्सने लीना तिवारी यांना भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 51 व्या स्थानावर ठेवले होते.

लीना तिवारी यांची कंपनी USV फार्मा इंजेक्टेबल्स, फार्मास्युटिकल घटक आणि बायोसिमिलर औषधे बनवते. ही कंपनी मधुमेहावरील औषधे बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे. या कंपनीचे नाव मधुमेहावरील औषध बनवणाऱ्या देशातील पहिल्या तीन कंपन्यांमध्ये घेतल्याचे सांगितले जाते. लीना तिवारीची सध्या अंदाजे नेटवर्थ $3.5 बिलियन म्हणजेच 28,000 कोटींपेक्षा जास्त आहे.

2021 मध्ये लीना तिवारी यांनी आरोग्य सेवा क्षेत्रासाठी 24 कोटी रुपयांची देणगी दिली. याशिवाय इतर क्षेत्रातही ती वेळोवेळी करोडो रुपयांची देणगी देते. लीना तिवारी यांच्या पतीचे नाव प्रशांत तिवारी आहे. प्रशांत तिवारी सध्या USV चे व्यवस्थापकीय संचालक आहेत. विशेष म्हणजे प्रशांत तिवारी हे देखील आयआयटीयन आहेत. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. दोघांनाही एक मुलगी असून तिचे नाव अनिशा गांधी तिवारी आहे.