बॉक्स ऑफिसवर चालली ‘पूजा’ची जादू, आयुष्मान खुराना-अनन्या पांडेचा ड्रीम गर्ल 2 करत आहे जबरदस्त कमाई


25 ऑगस्ट रोजी आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे स्टारर चित्रपट ड्रीम गर्ल 2 थिएटरमध्ये प्रदर्शित झाला असून लोकांना हा चित्रपट खूप आवडत आहे. आजकाल गदर 2 आणि OMG 2 सारखे मोठे चित्रपट थिएटरमध्ये चालू आहेत. दोन चित्रपटांच्या दरम्यानही ड्रीम गर्ल 2 चांगली कामगिरी करत आहे. पहिल्या दिवसापासून हा चित्रपट चांगला व्यवसाय करत आहे. रिलीजच्या तिसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत मोठी झेप घेतली आहे.

चित्रपटाने ओपनिंग डे म्हणजेच शुक्रवारी 10.69 कोटींचा व्यवसाय केला. पहिल्या दिवसाच्या तुलनेत दुसऱ्या दिवशी कमाईच्या आकडेवारीत वाढ झाली आहे. शनिवारी या चित्रपटाने 14.02 कोटींची कमाई केली होती. तिसऱ्या दिवशीही, ड्रीम गर्ल 2 ची जादू बॉक्स ऑफिसवर चालली आहे आणि या चित्रपटाने सुरुवातीच्या दोन्ही दिवसांच्या तुलनेत रविवारी आणखी चांगला व्यवसाय केला आहे.

Sacnilk च्या सुरुवातीच्या अहवालानुसार, ड्रीम गर्ल 2 ने तिसऱ्या दिवशी अंदाजे 16 कोटींचा व्यवसाय केला आहे, जो एक चांगला आकडा आहे आणि चार वर्षांनंतरही पूजाचे आकर्षण कायम असल्याचे दिसून येते. या चित्रपटाचा पहिला भाग 2019 मध्ये प्रदर्शित झाला होता. लोकांना तो भाग खूप आवडला, त्यानंतर निर्मात्यांनी आता ड्रीम गर्ल 2 आणला आहे. ड्रीम गर्ल 2 ने तीन दिवसात 40.71 कोटी कमावले आहेत.

तुम्हाला सांगतो, ड्रीम गर्लने बॉक्स ऑफिसवर 142.26 कोटींचा व्यवसाय केला होता. मागच्या भागात नुसरत भरुचा आयुष्मानची हिरोईन म्हणून चित्रपटात दिसली होती. नुसरत ड्रीम गर्ल 2 चा भाग नसली, तरी यावेळी आयुष्मानची हिरोईन म्हणून अनन्या पांडे दिसली आहे. आयुष्मान आणि अनन्याचा हा पहिलाच एकत्र चित्रपट आहे. यामध्ये परेश रावल, विजय राज, राजपाल यादव देखील दिसले आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज शांडिल्य यांनी केले आहे. तर एकता कपूर आणि शोभा कपूर निर्मात्या आहेत. मात्र, हा चित्रपट पहिला भाग मागे टाकतो की नाही हे पाहावे लागेल.