JioBook : Jio ने लॉन्च केला सर्वात स्वस्त लॅपटॉप, या दिवसापासून सुरु होणार विक्री


तुम्हीही स्वस्त लॅपटॉपच्या शोधात असाल, तर रिलायन्स जिओने तुमच्यासाठी JioBook लाँच केले आहे. JioBook पहिल्यांदा गेल्या वर्षी इंडिया मोबाइल काँग्रेसमध्ये लॉन्च करण्यात आला होता. JioBook विशेषतः विद्यार्थ्यांना लक्षात घेऊन लॉन्च करण्यात आला आहे. JioBook मध्ये JioOS ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे.

5 ऑगस्टपासून Amazon India वरून JioBook ची विक्री होणार आहे. याशिवाय रिलायन्स डिजिटलच्या ऑनलाइन स्टोअरमधून JioBook खरेदी करता येईल. लॅपटॉपची विक्री ऑफलाइन स्टोअरमधूनही केली जाईल. लॅपटॉपचा मॉडेल क्रमांक JIO JioBook NB1112MM BLU (2023) आहे. JioBook ची किंमत 16,499 रुपये आहे.

1. 4G GHz चा LTE स्पीड JioBook सोबत उपलब्ध असेल. यात ड्युअल बँड वाय-फाय देखील आहे. JioBook सोबत 75+ कीबोर्ड शॉर्टकट उपलब्ध असतील. याशिवाय, ट्रॅकपॅड जेश्चर देखील उपलब्ध असेल. लॅपटॉपमध्ये वायरलेस प्रिंटिंग फीचर देखील आहे.

विद्यार्थी JioBook मध्ये दिलेल्या JioBIAN सह C/C++, Java, Python आणि Pearl कोडिंग देखील शिकू शकतात. लॅपटॉपचे एकूण वजन 990 ग्रॅम आहे. यात 2.0GHz स्पीडसह ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे. JioBook मध्ये 4GB LPDDR4 RAM सह 64GB स्टोरेज आहे. यात 11.6-इंचाचा अँडी ग्लेअर एचडी डिस्प्ले आहे.