पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 1 ऑगस्ट रोजी पुण्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हा पुरस्कार पंतप्रधान मोदींना का दिला जात आहे? हा पुरस्कार कोणाकडून दिला जातो? आतापर्यंत किती भारतीय पंतप्रधानांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? गेल्या वर्षी या पुरस्काराने कोणाला गौरविण्यात आले? चला जाणून घेऊया.
काय आहे लोकमान्य टिळक पुरस्कार? जाणून घ्या का दिला जात आहे पंतप्रधान मोदींना हा पुरस्कार
हा 41 वा लोकमान्य टिळक पुरस्कार आहे, जो पंतप्रधान मोदींना दिला जाणार आहे. 1 ऑगस्ट 2023 रोजी, लोकमान्य टिळकांच्या 103 व्या पुण्यतिथीला, टिळक स्मारक मंदिर ट्रस्ट (हिंद स्वराज संघ) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रतिष्ठित लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करेल.
दरवर्षी दिला जातो हा पुरस्कार
लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीनिमित्त हा प्रतिष्ठेचा पुरस्कार ट्रस्टतर्फे दरवर्षी कोणाला ना कोणाला दिला जातो. लोकमान्य टिळक हे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक प्रमुख व्यक्तिमत्व होते. बाळ गंगाधर टिळक हे भारतीय स्वराज्याचे (स्वराज्य) खंबीर समर्थक होते आणि त्यांनी जनतेला संघटित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
पंतप्रधान मोदींना का दिला जात आहे हा पुरस्कार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अपवादात्मक नेतृत्व आणि नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना वाढवण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांसाठी हा पुरस्कार देण्यात येत असल्याचे ट्रस्टचे म्हणणे आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देश सातत्याने पुढे जात आहे. त्यामुळे या पुरस्काराचे 41वे प्राप्तकर्ता म्हणून पंतप्रधान मोदी यांची निवड करण्यात आली असून, त्यामध्ये स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र देण्यात येणार आहे.
2022 मध्ये कोणाला देण्यात लोकमान्य टिळक पुरस्कार
भारताची ‘मिसाईल वुमन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ शास्त्रज्ञ टेसी थॉमस यांना गेल्या वर्षी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. त्यांनी अग्नी-IV आणि अग्नी-V क्षेपणास्त्र प्रणालींसाठी प्रकल्प संचालक म्हणून काम केले आणि देशाच्या संरक्षण क्षमतेत महत्त्वपूर्ण योगदान दिले.
यांनाही मिळाला आहे पुरस्कार
पंतप्रधान मोदींपूर्वी मनमोहन सिंग, अटलबिहारी वाजपेयी, इंदिरा गांधी, शरद पवार, राहुल बजाज, सायरस पूनावाला यांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.