भारतात 5 ऑक्टोबरपासून एकदिवसीय विश्वचषक खेळवला जाणार आहे. स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी होणार आहे. भारतातील 10 शहरांमध्ये होणाऱ्या या विश्वचषक स्पर्धेच्या तारखा जाहीर झाल्या असल्या तरी काही सामन्यांच्या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी नुकतीच याला दुजोरा दिला. भारत-पाकिस्तान सामन्यातही हे बदल पाहायला मिळतील.
World Cup: 15 ऑक्टोबरला नव्हे तर या दिवशी होणार भारत-पाक महामुकाबला ! नवरात्रीमुळे वेळापत्रक बदलले
आयसीसीने जाहीर केलेल्या वेळापत्रकात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 15 ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. याच दिवशी नवरात्रीचा पहिला दिवस आहे. अशा परिस्थितीत सुरक्षा यंत्रणांनी बीसीसीआयला तारखा बदलण्यास सांगितले होते. याबाबत बोर्डाची बैठकही झाली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा सामना 14 ऑक्टोबरला खेळवला जाऊ शकतो. केवळ भारत-पाकिस्तानच नाही तर इतर काही सामन्यांच्या तारखांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. बीसीसीआय सोमवारी (31 जुलै) याबाबत अधिकृत घोषणा करू शकते.