Viral Video : तुम्ही कधी कासवाला साप खाताना पाहिले आहे का? लोकांचा त्यांच्या डोळ्यांवर बसत नाही विश्वास


कधी-कधी अशी दृश्ये कॅमेऱ्यात कैद होतात, जी पाहून लोकांच्या डोळ्यांवर विश्वास ठेवणे कठीण जाते. साधारणपणे तुम्हाला असे वाटेल की कासव हा शाकाहारी प्राणी आहे. मात्र कासवाशी संबंधित असा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो पाहून नेटकऱ्यांना धक्का बसला आहे. आमच्यावर विश्वास ठेवा, हा व्हिडीओ तुम्हालाही थक्क करेल. कारण, व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये कासव सापाला खाऊन आपली भूक भागवताना दिसत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, नदीत एका खडकाच्या आच्छादनाखाली एक कासव लपून बसले आहे. त्याचबरोबर नदीच्या पाण्याचा प्रवाहही खूप वेगवान आहे. इतक्यात वाहत्या खडकाजवळ एक साप येतो. पण पुढच्या क्षणी जे काही घडते ते पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. कासव चटकन खडकातून बाहेर पडतो आणि एका झटक्यात सापाला तोंडात पकडतो. व्हिडिओमध्ये कासवाची चपळता पाहण्यासारखी आहे.


कासवाचा हा अत्यंत धक्कादायक व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर @unilad नावाच्या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. युजर आश्चर्यचकित झाला आणि कॅप्शनमध्ये लिहिले, मला कल्पना नव्हती की कासव देखील साप खाऊ शकतो. या व्हिडिओला आतापर्यंत 77 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. मात्र, हा व्हिडिओ पाहून बहुतांश युजर्सना धक्का बसला आहे.

मजेशीर पद्धतीने प्रतिक्रिया देताना, एका वापरकर्त्याने कमेंट केली, लो भैया…आणि मी विचार करत होतो की कासवाला पिझ्झा आवडतो. तर, इतर म्हणतात, काही कासवे खूप हुशार असतात. हे त्यापैकी एक असेल. आणखी एका यूजरने लिहिले आहे की, कासवाने सापावर ज्या वेगाने हल्ला केला, ते पाहून मी थक्क झालो आहे.