डब्ल्यूपीएल एलिमिनेटरपूर्वी मिचेल स्टार्कने अॅलिसा हिलीला दिला आश्चर्यचा धक्का


महिला प्रीमियर लीगच्या एलिमिनेटर सामन्याच्या आधी, यूपी वॉरियर्सची कर्णधार अॅलिसी हीलीला एक सुंदर आश्चर्यचा धक्का मिळाला. हिलीचा पती आणि ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क तिला भेटण्यासाठी पोहोचला.

स्टार्क यूपी वॉरियर्सच्या कॅम्पमध्ये पोहोचला, कारण तो प्रसंग खूप खास होता. खरंतर आज (२४ मार्च) त्याची पत्नी एलिस हिलीचा वाढदिवस आहे आणि तिला सरप्राईज देण्यासाठी तो यूपी वॉरियर्स कॅम्पमध्ये पोहोचला.

स्टार्कने त्याची पत्नी अॅलिसा हिलीचा वाढदिवस यूपी वॉरियर्सच्या इतर खेळाडूंसोबत साजरा केला. हिलीने तोंडावर केक लावण्यात आला. हीलीच्या चेहऱ्यावर केक अशा प्रकारे लावण्यात आला होता की तिला ओळखणे कठीण झाले होते.

मिचेल स्टार्क पत्नी एलिसा हिलीला सपोर्ट करण्यासाठी भारतातच थांबला आहे. हा डावखुरा गोलंदाज नुकताच भारताविरुद्धच्या वनडे मालिकेत चमकदार गोलंदाजी करताना दिसला. या खेळाडूने तीन सामन्यांच्या मालिकेत 8 विकेट घेत एकदिवसीय मालिकेत ऑस्ट्रेलियाला चॅम्पियन बनवले.

मिचेल स्टार्कने आपले काम चोख बजावले आहे. आता त्याची पत्नी एलिसा हिली हिच्या नेतृत्वाखाली यूपी वॉरियर्सला प्रथम अंतिम फेरीत आणि नंतर चॅम्पियन बनवायचे आहे, याकडे लक्ष असेल. एलिमिनेटरमध्ये यूपी संघाचा सामना मुंबईशी होईल आणि हा सामना जिंकणाऱ्या संघाचा अंतिम फेरीत दिल्ली कॅपिटल्सशी सामना होईल.