Oscar 2023 : का मिळाला भारताच्या ‘द एलिफंट व्हिस्पर्स’ला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार…


95 वा अकादमी पुरस्कार म्हणजेच ऑस्कर पुरस्कारांच्या घोषणेला सुरूवात झाली आहे. देशातच नाही तर परदेशातही आता भारतीय चित्रपट प्रसिद्ध होऊ लागले आहेत. भारतीय चित्रपट द एलिफंट व्हिस्परर्सने समारंभात सर्वोत्कृष्ट माहितीपट लघुपटाचा पुरस्कार जिंकला. हॉलआउट, हाऊ डू यू मेजर अ इयर?, द मार्था मिचेल इफेक्ट आणि स्ट्रेंजर अॅट द गेट या मोठ्या चित्रपटांची नावेही या श्रेणीत समाविष्ट करण्यात आली होती. गुनीत मोंगा निर्मित कार्तिक गोन्साल्विसच्या द एलिफंट व्हिस्पर्सला सर्वोत्कृष्ट लघुपटासाठी नामांकन मिळाले होते.

‘द एलिफंट व्हिस्पर्स’ हा तमिळ भाषेतील डॉक्युमेंटरी चित्रपट आहे, जो गेल्या वर्षी 8 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला होता. पिढ्यानपिढ्या हत्तींसोबत काम करणाऱ्या आणि जंगलाच्या गरजा जाणून घेणाऱ्या लोकांची ही कथा आहे. चित्रपटाची कथा एका भारतीय कुटुंबाभोवती फिरते, जे तामिळनाडूच्या मुदुमलाई व्याघ्र प्रकल्पात हत्तीच्या दोन अनाथ पिल्लांना दत्तक घेतात. भारतीय कुटुंब आणि अनाथ हत्ती यांचे जबरदस्त बॉन्डिंग चित्रपटात दाखवण्यात आले आहे. हा चित्रपट मानवांचे हत्ती आणि इतर प्राण्यांशी असलेले नाते अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करतो.

जर तुम्हाला डॉक्युमेंटरी फिल्म्स बघायला आवडत असतील तर तुम्ही OTT प्लॅटफॉर्म Netflix वर त्याचा आनंद घेऊ शकता.

पाहा चित्रपटाचा ट्रेलर-

जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर या चित्रपटाची खूप प्रशंसा झाली. बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा देखील या चित्रपटाचे कौतुक केल्याशिवाय राहू शकली नाही. इंस्टाग्राम स्टोरीजमध्ये या चित्रपटाचे कौतुक करताना तिने लिहिले की, “मी नुकताच पाहिलेला हृदयस्पर्शी माहितीपटांपैकी एक. मला हा चित्रपट आवडला. ही अद्भुत कथा जिवंत केल्याबद्दल कार्तिकी गोन्साल्विस आणि गुनीत मोंगा यांचे अभिनंदन.