WPL : 4 मार्चपासून सुरू होणार डब्ल्यूपीएलचा रणसंग्राम, जाणून घ्या तुमचा आवडता संघ कधी खेळणार


अनेक वर्षांपासूनची चाहत्यांची प्रतीक्षा अखेर संपणार आहे. BCCI ची महिला प्रीमियर लीग (WPL) 4 मार्चपासून म्हणजे दोन दिवसांनी सुरू होणार आहे. याकडे महिला क्रिकेटमधील एक नवी सुरुवात म्हणून पाहिले जात आहे. पहिल्या हंगामासाठी पाच संघांची निवड करण्यात आली असून, त्यांचा लिलाव गेल्या महिन्यातच झाला होता. दिल्ली कॅपिटल्स व्यतिरिक्त इतर सर्वांनी त्यांच्या कर्णधारांची घोषणा केली आहे. आता या लीगचा पहिला सामना कधी खेळला जाईल याची चाहत्यांना प्रतीक्षा आहे.

महिला प्रीमियर लीगचे संपूर्ण वेळापत्रक गेल्या महिन्यातच जाहीर करण्यात आले. पाच संघ विजेतेपदासाठी 22 सामने खेळतील. या 22 सामन्यांपैकी 20 साखळी सामने असतील. याशिवाय एलिमिनेटर आणि त्यानंतर अंतिम सामना खेळवला जाईल. डीवाय पाटील येथे 11 सामने आणि ब्रेबॉर्न स्टेडियमवर तेवढेच सामने होणार आहेत. लीगमधील पहिला सामना गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे आणि अंतिम सामना 26 मार्च रोजी डी.वाय.पाटील येथे होणार आहे.

WPL पूर्ण वेळापत्रक

4 मार्च – गुजरात जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स – संध्याकाळी 7:30 – डीवाय पाटील स्टेडियम

5 मार्च – रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स – दुपारी 3:30 – ब्रेबॉर्न स्टेडियम

5 मार्च – यूपी वॉरियर्स विरुद्ध गुजरात जायंट्स – संध्याकाळी 7:30 – डीवाय पाटील

6 मार्च – मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर – संध्याकाळी 7:30 – ब्रेबॉर्न स्टेडियम

7 मार्च – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध यूपी वॉरियर्स – संध्याकाळी 7:30 – डीवाय पाटील

8 मार्च – गुजरात जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर – संध्याकाळी 7:30 – ब्रेबॉर्न स्टेडियम

9 मार्च – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स – संध्याकाळी 7:30 – डीवाय पाटील

10 मार्च – रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध यूपी वॉरियर्स – संध्याकाळी 7:30, ब्रेबॉर्न स्टेडियम

11 मार्च – गुजरात जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स – संध्याकाळी 7:30 – डीवाय पाटील

12 मार्च – यूपी वॉरियर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स – संध्याकाळी 7:30 – ब्रेबॉर्न

13 मार्च – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर – संध्याकाळी 7:30 – डीवाय पाटील

14 मार्च – मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जायंट्स – संध्याकाळी 7:30 – ब्रेबॉर्न

15 मार्च – यूपी वॉरियर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर – संध्याकाळी 7:30 – डीवाय पाटील

16 मार्च – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात जायंट्स – संध्याकाळी 7:30 – ब्रेबॉर्न

18 मार्च – मुंबई इंडियन्स विरुद्ध यूपी वॉरियर्स – दुपारी 3:30 – डीवाय पाटील

18 मार्च – रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध गुजरात जायंट्स – संध्याकाळी 7:30 – ब्रेबॉर्न

20 मार्च – गुजरात जायंट्स विरुद्ध यूपी वॉरियर्स – दुपारी 3:30, ब्रेबॉर्न

20 मार्च – मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स – संध्याकाळी 7:30, डीवाय पाटील

21 मार्च – रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स – दुपारी 3:30, डीवाय पाटील

21 मार्च: यूपी वॉरियर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स – संध्याकाळी 7:30, ब्रेबॉर्न

24 मार्च: एलिमिनेटर – संध्याकाळी 7:30, डीवाय पाटील

26 मार्च: अंतिम – 7:30 PM, ब्रेबॉर्न