दारुची गुणवत्ता सांगण्याचे काम करते आयपीएल संघाच्या कर्णधाराची पत्नी, अनाथ मुलांशी आहे खास नाते


दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटर एडन मार्करामच्या क्रिकेट करिअरमध्ये मोठा बदल झाला आहे. हा खेळाडू आता जगातील सर्वात मोठ्या लीग IPL चे नेतृत्व करताना दिसणार आहे. सनरायझर्स हैदराबादने मार्करामला नवा कर्णधार बनवले आहे. मार्करामने अलीकडेच दक्षिण आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या SA20 लीगमध्ये सनरायझर्स फ्रेंचायझी ईस्टर्न केपला चॅम्पियन बनवले आणि आता त्याच्यावर आयपीएलमध्येही संघाला विजेता बनवण्याची जबाबदारी आली आहे.

एडन मार्करामच्या या यशामागे त्याची मेहनत आहे, पण यात त्याच्या पत्नीचाही महत्त्वाचा वाटा आहे.

एडन मार्करामची पत्नी निकोल डॅनिएली ओ’कॉनर अनेकदा त्याच्या पतीला पाठिंबा देण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचते. नुकताच त्यांचा एक भावूक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये निकोल रडताना दिसली. एसए20 लीगच्या उपांत्य फेरीत पती एडन मार्करामने शतक झळकावल्यामुळे निकोलच्या डोळ्यात आनंदाश्रू होते.

एडन मार्करामच्या टॅलेंटबद्दल संपूर्ण जगाला माहिती आहे पण आम्ही तुम्हाला त्याची पत्नी निकोलबद्दल सांगत आहोत. निकोल एक उद्योजिका आहे, तिचा ऑनलाइन दागिन्यांचा व्यवसाय आहे.

याशिवाय दारु टेस्टिंगचे कामही निकोल डॅनिएली ओ’कॉनर करते. आम्ही तुम्हाला सांगतो की वेगवेगळ्या प्रकारची दारु चाखल्यानंतर ती त्याच्या गुणवत्तेबद्दल सांगते.

याशिवाय निकोल अब्बा हाऊस या धर्मादाय संस्थेशीही संबंधित आहे, ज्यामध्ये ती अनाथ मुलांना घरे उपलब्ध करून देते.