देसी व्हायब्समध्येही कमी झाला नाही कृष्णा श्रॉफचा बोल्डनेस


ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ यांची मुलगी कृष्णा श्रॉफ हिचा अभिनय जगताशी काहीही संबंध नाही. पण तिला पसंक करणाऱ्या लोकांची देखील कमी नाही. कृष्णा श्रॉफ ही तिचा भाऊ टायगरसारखी फिटनेस फ्रीक आहे. तिला स्वतःला तंदुरुस्त ठेवायला आवडते. खऱ्या आयुष्यात कृष्णा फिट असण्यासोबतच खूप बोल्ड आहे. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

कृष्णा श्रॉफने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचे ताजे फोटो शेअर केले आहेत. ज्यांच्यावरुन चाहत्यांना इच्छा असूनही नजर हटवता येत नाही. या फोटोंमध्ये कृष्णा पारंपरिक पोशाख परिधान केलेला दिसत आहे.

पण तिने लेहेंग्यासह अतिशय बोल्ड ब्लाउज कॅरी केला आहे. या डीपनेक ब्लाउजने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या पांढऱ्या रंगाच्या ब्लाउजमुळे कृष्णाचा संपूर्ण पोशाख खूपच स्टायलिश झाला आहे.

फोटोंमध्ये जॅकी श्रॉफची लाडकी लेक वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे. तिची प्रत्येक स्टाईल तिच्या चाहत्यांना आवडते. कृष्णा तिच्या स्टाईलने इंटरनेटचे तापमान वाढवत राहते.