किम कार्दशियनने विकत घेतला प्रिन्सेस डायनाचा बहुमुल्य हार, किंमत ऐकूण तुम्ही व्हाल अव्वाक्


अमेरिकन टीव्ही रिअॅलिटी टीव्ही स्टार किम कार्दशियनने राजकुमारी डायनाचा हार (अत्तलाह क्रॉस) खरेदी केला आहे. एका लिलावात तिने हा हार विकत घेतला. या नेकलेससाठी किम कार्दशियनने किती पैसे मोजले आहेत ते जाणून घेऊया.

हा हार तिने लिलावात विकत घेतला. किम कार्दशियनने हा नेकलेस सुमारे $200,000 ला विकत घेतला आहे. या नेकलेससाठी किम कार्दशियनने भारतीय रुपयांमध्ये सुमारे 1.6 कोटी रुपये मोजले आहेत.

एका रिपोर्टनुसार, हा हार 1920 मध्ये एका ब्रिटिश ज्वेलरने बनवला होता. हा हार राजकुमारी डायनाने परिधान केला होता. सध्या हा नेकलेस प्रसिद्ध टीव्ही स्टार आणि मॉडेल किम कार्दशियनचा आहे.

या हाराबद्दल किमचे चाहते तिचे अभिनंदन करत आहेत. त्याच वेळी, ते लवकरच हा हार घालण्याची आणि छायाचित्रे शेअर करण्याची मागणी करत आहेत. किम सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

किम दररोज तिचे बोल्ड फोटो शेअर करत असते. सध्या तिचे चाहते तिच्या गळ्यातल्या नव्या फोटोंची आतुरतेने वाट पाहत आहेत. किम तिच्या नात्याबद्दलही चर्चेत असते.