गडकरीच नाही तर अनेक बडे नेते बागेश्वर बाबांच्या दरबारात लावतात हजेरी, पाहा यादी


नागपुरातील बागेश्वर धामचे बाबा धीरेंद्र शास्त्री यांच्यावर चमत्काराच्या नावाखाली अंधश्रद्धेला प्रोत्साहन दिल्याचा आरोप आहे. जादूटोणाविरोधी संघटना ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ने बाबांवर हा आरोप केला आहे. समितीने बाबांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

नतमस्तक झाले नितीन गडकरी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नुकतेच नागपुरात बाबांच्या कार्यक्रमाला पोहोचले होते. स्टेजवर गेल्यावर गडकरींनी बाबांना नमन तर केलेच, पण बराच वेळ बाबांशी गप्पाही मारल्या.

देवेंद्र फडणवीस यांचाही आहे समावेश
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील बाबा बागेश्वरच्या धामला हजेरी लावणाऱ्यांमध्ये आहेत.

व्हायरल झाला होता नरोत्तम मिश्रा यांचाही फोटो
बाबांच्या दरबारात हजेरी लावणाऱ्यांच्या यादीत मध्य प्रदेशचे मंत्री नरोत्तम मिश्रा यांचेही नाव आहे. नरोत्तम मिश्रा यांचा बाबांसोबतचा एक फोटोही व्हायरल झाला होता.

रामायणातील रामावर बाबांचा प्रभाव
बाबांना भेटलेल्यांमध्ये टीव्ही अभिनेता अरुण गोविलचाही समावेश आहे. रामानंद सागर यांच्या रामायणात श्रीरामाची भूमिका करणारा अरुण गोविलही बागेश्वर धामला गेला होता.