‘पठाण की मेहफिल में आ जाओ’ – प्रतीक्षा संपली, शाहरुख खानने जाहीर केली ट्रेलरच्या रिलीजची तारीख


शाहरुख खान, दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम स्टारर पठाण या चित्रपटाच्या ट्रेलरची वाट पाहत असलेल्या चाहत्यांसाठी मोठी बातमी आली आहे. बॉलीवूडचा बादशाह शाहरुखने सोमवारी घोषणा केली की पठाणचा ट्रेलर मंगळवारी 10 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता प्रदर्शित होणार आहे. पठाणचा ट्रेलर हिंदी, तामिळ आणि तेलगू या तिन्ही भाषांमध्ये रिलीज होणार आहे.

शाहरुख खानचे चाहते खूप दिवसांपासून पठाणच्या ट्रेलरची वाट पाहत होते. आता प्रतीक्षाची वेळ संपणार आहे. शाहरुख खान चार वर्षांनंतर पठाणसोबत मोठ्या पडद्यावर परतणार आहे. झिरो हा त्याचा शेवटचा चित्रपट होता, जो बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करू शकला नाही. आता निर्मात्यांसोबत शाहरुख खानलाही पठाणकडून मोठ्या आशा आहेत. या चित्रपटाचे अनेक पोस्टर्स आणि दोन गाणी यापूर्वीच रिलीज झाली आहेत.

वादात सापडला आहे शाहरुख खानचा पठाण
शाहरुख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, हा चित्रपटही प्रचंड वादात सापडला आहे. बेशरम रंग हे पहिले गाणे रिलीज होताच वाद निर्माण झाला होता. खरं तर, गाण्यात दीपिकाने काही काळ खास रंगाची बिकिनी परिधान केली होती. यावर दीपिकाने भगवी बिकिनी घातली होती, ज्यामुळे हिंदूंच्या श्रद्धा दुखावल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर या चित्रपटाला विरोध होत असून बहिष्कार टाकण्याची मागणीही होत आहे.

किती आहे शाहरुखच्या पठाण चित्रपटाचे बजेट ?
यशराज बॅनरखाली बनलेल्या पठाणचे बजेट जवळपास 250 कोटी रुपये आहे. वृत्तानुसार, या चित्रपटासाठी शाहरुख खानला जवळपास 100 कोटी रुपये फी म्हणून देण्यात आली आहे. याशिवाय निर्मात्यांनी जॉन अब्राहम आणि दीपिका पदुकोण यांनाही मोठी रक्कम दिली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात सलमान खानही कॅमिओ करताना दिसणार आहे. मात्र, तो ट्रेलरमध्ये दिसणार की नाही, याबाबत अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित हा चित्रपट 25 जानेवारी रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.