रोनाल्डोला पार्टनर जोर्जिनाकडून नाताळचे खास गिफ्ट

पायाच्या जादूने फुटबॉल जगतात लोकप्रिय असलेल्या पोर्तुगालचा स्टार फुटबॉलर क्रिस्तियानो रोनाल्डो जगातील श्रीमंत खेळाडूपैकी एक मानला जातो. त्याच्या आयुष्यात त्याला काहीच कमी नाही. तरीही आपल्या प्रिय व्यक्तीने दिलेले गिफ्ट पाहताच रोनाल्डोचे डोळे आनंदाने चमकल्याचा व्हिडीओ नुकताच सोशल मिडीयावर वेगाने व्हायरल झाला आहे. रोनाल्डोची पार्टनर जॉर्जीना रॉड्रीकने रोनाल्डोला नाताळ भेट म्हणून रोल्स रॉइस दिली असून या अलिशान कारची किंमत सुमारे तीन कोटी आहे.

जॉर्जीनाने या संदर्भात तिच्या इन्स्टावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात रोनाल्डो घराबाहेर पडत असताना दिसत असून अंगणात उभी असलेली रोल्स रॉइस पाहून डोळे आनंदाने मोठे करताना दिसतो आहे. जॉर्जीया त्याला सरप्राईज म्हणते आहे आणि पूर्ण परिवार या गाडीतून एका राईड साठी जाताना दिसतो आहे.

रोनाल्डोने सुद्धा त्यांच्या इन्स्टा अकौंटवर ही अविश्वसनीय गिफ्ट दिल्याबद्दल जॉर्जीयाला धन्यवाद दिले आहेत.  युनायटेड मँचेस्टरने रोनाल्डो बरोबरचा करार संपुष्टात आणल्यानंतर रोनाल्डोने सौदीच्या अल नासीर क्लब बरोबर करार केल्याचे स्पॅनिश प्रसारमाध्यमातून आले आहे. प्रत्येक सिझन साठी रोनाल्डोला या क्लबकडून २०० दशलक्ष युरो मिळणार आहेत असे समजते.