जान्हवी कपूरने खरेदी केले ६५ कोटींचे नवे घर

बॉलीवूड मध्ये अल्पावधीत लोकप्रिय ठरलेली, तरुणाच्या दिलाची धडकन, जान्हवी कपूर हिने मुंबईच्या पॉश पाली हिल भागात अलिशान डुप्लेक्स घर खरेदी केले आहे. या घराची किंमत ६५ कोटी रुपये सांगितली जात आहे. बॉलीवूड मध्ये येऊन जान्हवीला अवघी पाच वर्षेच झाली आहेत. अर्थात नवे घर तिने बहिण ख़ुशी आणि वडील बोनी कपूर यांच्या सह एकत्र खरेदी केले असल्याचे समजते. या भागात जागांचा दर १ लाख रुपये चौरस फूट आहे. रियल इस्टेट पोर्टल इंडेक्सटॅप डॉट कॉम वरील माहितीनुसार १२ ऑक्टोबर रोजी या घराची नोंदणी जान्हवीने केली असून त्यासाठी ३.९० कोटी मुद्रांक शुल्क भरले आहे.

जान्हवीचे नवे घर पहिला आणि दुसरा मजला असे डुप्लेक्स असून त्याला पाच कार पार्किंग आहेत. हे घर ६४२१ चौरस फुट आहे. पहिल्या मजल्यावर स्विमिंग पूल आणि ओपन गार्डन आहे. पाली हिल हा बांद्रयाचा अतिशय पॉश एरिया आहे आणि येथे अनेक सेलेब्रिटी, उद्योगपती राहतात. जुलै मध्ये जान्हवीने तिचे ३४५६ चौरस फुटाचे पहिले घर बॉलीवूड अभिनेता राजकुमार राव याला ४४ कोटींना विकले होते असे समजते.

आगामी काळात जान्हवीचे अनेक चित्रपट येत आहेत. पैकी ‘मिली’ ४ नोव्हेंबरला रिलीज होत आहे, मिस्टर अँड मिसेस माही, बवाल हे तिचे आणखी काही आगामी चित्रपट आहेत.