‘किंग’ विराट कोहली झाला ३४ वर्षांचा

टीम इंडियाचा स्टार फलंदाज आणि माजी कप्तान विराट कोहली ५ नोव्हेंबर रोजी आपला ३४ वा वाढदिवस साजरा करत आहे. ५ नोव्हेंबर १९८८ रोजी त्याचा जन्म झाला असून यंदाचा वाढदिवस तो ऑस्ट्रेलियात साजरा करत आहे. तेथे आयसीसी टी २० वर्ल्ड कपच्या सामन्यात विराट टीम इंडिया तर्फे खेळत आहे. कसोटी, टी २० आणि वन डे अश्या तिन्ही प्रकारात विराटने टीम इंडियासाठी नेतृत्व केले असून त्याची कारकीर्द यशस्वी मानली जाते. अंडर १९ वर्ल्ड कप मध्ये विराटनेच टीम इंडियाचे नेतृत्व करून विश्व कप जिंकला होता.

मात्र आयसीसी इव्हेंट मध्ये एकही खिताब विराट टीम इंडियासाठी विराट जिंकू शकलेला नाही आणि त्याची खंत तो नेहमी बोलून दाखवितो. २०१४ मध्ये टेस्ट क्रीकेट कप्तान झाल्यावर त्याने परदेशी भूमीवर सुद्धा अनेक महत्वाचे विजय मिळविले आहेत. टेस्ट नंबर वन टीम, आयसीसी वर्ल्ड टेस्ट चँपियन फायनल मध्ये मजल असे अनेक पराक्रम त्याने केले आहेत. ऑस्ट्रेलिया, द. आफ्रिका मध्ये त्यांच्याच देशात त्यांचा टीमना पराभवाची चव त्याने चाखविली आहे. २०१७ मध्ये विराट कडे मर्यादित षटक सामन्यांचे कप्तानपद आले. त्याने या काळात अनेक ऐतिहासिक विजय मिळविले. धोनी नंतर विराट टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कप्तान मानला जातो.

ऑस्ट्रेलिया टी २० वर्ल्ड कप २०२२ मध्ये विराट सर्वाधिक रन्स काढणारा फलंदाज आहे. विराट सुरवातीला ‘चिकू’ या टोपण नावाने प्रसिद्ध होता मात्र आता तो किंग नावाने ओळखला जातो. फिटनेसचे त्याचे वेड जगप्रसिद्ध आहे. त्याने टीम इंडियासाठी ६८ कसोटी कप्तानपद भूषविले असून त्यात ४० विजय मिळविले आहेत. ९५ वन डे मध्ये ६५ विअज्य मिळविले आहेत. यंग जनरेशन साठी विराट हा प्रेरणास्त्रोत बनून राहिला आहे.