‘भारताला हरवा, मला मिळवा’ पाक अभिनेत्रीची झिम्बावे संघाला ऑफर

पाकिस्तानची सौदर्यवती अभिनेत्री सेहर शिनवारी वादग्रस्त विधाने करून नेहमीच चर्चेत असते. आता पुन्हा नव्याने ती अशाच एका विधानाने चर्चेत आली आहे. टी २० वर्ल्ड कप मध्ये तिने झिम्बाब्वे संघाला एक ऑफर दिली आहे. आयसीसी टी २० वर्ल्ड कप २०२२ च्या सुपर १२ राउंड अंतिम टप्प्यात आल्या असताना सेहरने दिलेल्या ऑफरची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

पाकिस्तान अंतिम टप्प्यात सामील आहे मात्र अंतिम फेरीत कुठले संघ येणार हे अद्यापि स्पष्ट झालेले नाही. पाकिस्तान उपांत्य फेरीत पोहोचावा अशी सेहेरची इच्छा आहे. भारताला शेवटचा सामना झिम्बाब्वे विरुद्ध खेळायचा आहे. त्यामुळे सेहेरने झिम्बाबे संघाला, ‘भारताला हरवा, मी तुमच्यातील एका खेळाडूशी लग्न करेन’ अशी ऑफर दिली आहे. विशेष म्हणजे याच झिम्बाब्वे टीमने पाकिस्तानी संघाला टूर्नामेंट मध्ये धूळ चारली आहे. पण भारत पाकिस्तान सामना असला कि दोन्ही बाजूचे क्रिकेट प्रेमी किती अटीतटीला जातात याचेच उदाहरण सेहरच्या ऑफर मधून समोर आले आहे.

अर्थात असले विधान करायची सेहरची ही काही पहिली वेळ नाही. यापूर्वी न्यूझीलंडच्या क्रिकेटपटू जिमी निशाम याच्यावर सेहेर फिदा झाली होती आणि त्याच्या मुलाची आई बनण्याची इच्छा तिने व्यक्त केली होती. भारताच्या हार्दिक पांड्याला सुद्धा तिने २३ ऑक्टोबर च्या सामन्यात पाकिस्तान कडून हारा, म्हणजे तुला आणखी शिकायला मिळेल अशी कॉमेंट केली होती. पण भारतीय चाहत्यांनी तिची चांगलीच खिल्ली उडवली होती.