या गावात बिनकपड्याचे राहतात गावकरी

जगात अनेक देश, त्यात अनेक गावे आहेत आणि प्रत्येक देशाच्या किंवा त्या त्या गावांच्या विशेष रिती, परंपरा, खासियती आहेत. काही गावांतील राहणीमान विचित्र वाटावे असेही आहे. ब्रिटनच्या हर्डफोरशायर मधील एक गाव असेच आगळे आहे. या गावात नागरिक बिन कपड्याचे राहतात. ‘स्पीलप्लाटस’ असे या गावाचे नाव असून त्याचा अर्थ आहे खेळाचे मैदान. या गावाकडे गुप्त गाव म्हणूनही पाहिले जाते. येथे अनेक वर्षे म्हणजे सुमारे ९० वर्षे लहान मुलांपासून ते मोठ्या लोकांपर्यंत कुणीच कपडे घालत नाहीत.

चार्ल्स मॅस्काको नावाच्या एका व्यक्तीने १९२९ मध्ये या कम्युनिटीची स्थापना केली. त्याचे म्हणणे जन्माला येताना देवाने आपल्याला उघडेच म्हणजे कपड्यांशिवाय पाठविले आहे मग दिखावा करण्यासाठी कपडे हवेत कशाला? शहरी लोकांनी सुद्धा कपडे वापरूच नयेत असे त्याचे म्हणणे होते.

एखाद्याला असे वाटेल कि या गावाची आर्थिक स्थिती हलाखीची असेल म्हणून कपड्यांवर खर्च केला जात नसेल. पण तसे बिलकुल नाही. येथे सर्व प्रकारच्या सुखसुविधा आहेत. घरे, बंगले, स्विमिंग पूल, कार्स सर्व काही आहे. येथील लोक पार्ट्या, स्नेहसंमेलने साजरी करतात, रोजची सर्व कामे पार पाडतात फक्त कपडे घालत नाहीत. या गावात कपडे घातलेला कुणी दिसलाच तर तो पोस्टमन किंवा डिलिव्हरी बॉय असतो. येथे मोठ्या संखेने पर्यटक येतात. तुम्हाला गावात कायमचे राहायचे असेल तर तुम्हीही कपडे वापरणे सोडले पाहिजे अशी गावकऱ्यांची अपेक्षा आहे. मात्र तुम्ही कपडे घातलेत तर त्याला विरोध होत नाही. फक्त तुम्हाला मग थेथे कुणी घर विकत देत नाही.