राफेल नदालच्या घरी आला छोटा राफेल

स्पेनचा दिग्गज टेनसीपटू राफेल नदाल यांच्या घरी छोट्या राफेलचे आगमन झाले आहे. स्पेनच्या प्रसिद्ध फुटबॉल क्लबने या संदर्भात त्यांच्या अधिकृत सोशल मिडिया अकौंटवर ट्वीट करून ही बातमी दिली आहे. टेनिस जगातील दोन नंबरचा खेळाडू राफेल याची पत्नी मारिया पेरेलो हिने ८ ऑक्टोबर रोजी मुलाला जन्म दिला असून या जोडप्याचे हे पहिले अपत्य आहे. राफेलला अपत्य जन्माच्या शुभेच्छा मोठ्या संखेने दिल्या जात आहेत.

पुरुष एकेरीची २२ ग्रँड स्लॅम जिंकणाऱ्या राफेलचा विवाह मारिया फ्रासिस्का पेरेलो हिच्या बरोबर २०१९ मध्ये झाला आहे. या दोघांनी १४ वर्षे डेटिंग केल्यावर विवाहाचा निर्णय घेतला होता. राफेलने एका पत्रकार परिषदेत त्याची पत्नी मारिया प्रेग्नंट असल्याचे सांगितले होते. राफेल त्याच्या बाळाचे नाव राफेल असेच ठेवणार असल्याचे समजते. मारिया पूर्वी विमा एजंट म्हणून काम करत होती. मारिया सोशल मिडियावर चांगलीच सक्रीय असून पतीसोबतचे फोटो इन्स्टाग्रामवर सातत्याने शेअर करते.

स्पेनच्या रियल माद्रिद क्लबने केलेल्या ट्वीट मध्ये, आमचा प्रिय मानद सदस्य राफेल आणि मारिया पेरेलो यांना पहिल्या अपत्य जन्माच्या शुभेच्छा, या आनंदाचा क्षणी आम्ही त्यांच्या सोबत आहोत’ असे म्हटले आहे.