फिफा वर्ल्डकप मध्ये नोरा फतेहीचा परफॉर्मन्स

ग्लोबल आयकॉन,स्टनिंग डान्सर म्हणून प्रसिद्ध असलेली नोरा फतेही जागतिक नकाशावर पुन्हा एकदा भारताचे नाव कोरणार आहे. डिसेंबरमध्ये होणाऱ्या जागतिक फुटबॉल स्पर्धेमध्ये (फिफा) नोरा परफॉर्मन्स देणार आहे. त्यामुळे हॉलीवूड स्टार जेनेफार लोपेझ आणि नर्तिका गायिका शकिरा यांच्या नंतर नोरा फिफा मध्ये परफॉर्मन्स देणारी कलाकार ठरणार आहे. याच जागतिक मंचावर नोरा भारत आणि द.पूर्व आशियाचे प्रतिनिधित्व करणारी एकमात्र अभिनेत्री बनेल. यापूर्वी येथे लोपेझ आणि शकिराने परफोर्म केले आहे.

नोरा ज्या गाण्यावर परफॉर्मन्स देणार आहे त्याचे संगीतकार रेडऑन आहेत. पूर्वीही त्यांनी फिफा गाण्यांवर काम केले आहे. शकिराचे ‘वाका वाका’ आणि ‘ला ला ला’ रेडऑन यांनीच संगीतबद्ध केले होते. नोरा फिफा ओपनिंग आणि क्लोझिंग दोन्ही साठी परफॉर्मन्स देणार असून तसा करार केला गेला आहे. क्लोझिंग सेरेमनी मध्ये नोरा हिंदी गाण्यावर नृत्य करणार असल्याचे समजते. सध्या नोरा टीव्ही शो, झलक दिखला जा मध्ये जज म्हणून काम करत आहे.