Tata Tiago EV : टाटाने लॉन्च केली देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार


सणासुदीला सुरुवात झाली असून या काळात वाहन बाजाराही या उत्साहात भर घालत, टाटा मोटर्सने आज इलेक्ट्रिक कारच्या सेगमेंटमध्ये आणखी एक मॉडेल लाँच केले आहे. ही नवी कार Tata Tiago EV आहे. ही देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार आहे. ही कार तुम्ही फक्त 8.49 लाख रुपयांना खरेदी करू शकता आणि तुम्ही ती 10 ऑक्टोबरपासून बुक करू शकाल आणि त्याची डिलिव्हरी जानेवारी 2023 पासून सुरू होईल.

कसे आहे आतील इंटेरिअर
पेट्रोल आवृत्तीच्या तुलनेत टिगोर ईव्हीच्या आतील भागात किरकोळ बदल करण्यात आले आहेत. याचा डॅशबोर्ड ड्युअल कलरमध्ये सादर करण्यात आला आहे. यासोबतच प्रीमियम लेदर सीट कव्हर्स, हरमनची इन्फोटेनमेंट सिस्टम, अधिक उत्कृष्ट सीट कुशन देण्यात आले आहेत. या कारचा बेसिक प्लॅटफॉर्म पूर्वीसारखाच आहे.

किती आहे रेंज ?
या इलेक्ट्रिक कारमधील इलेक्ट्रिक मोटर 74 bhp पॉवर आणि 170 Nm टॉर्क जनरेट करते जी 26kWh बॅटरी पॅकसह जोडलेली आहे. ही इलेक्ट्रिक कार एका चार्जमध्ये 310 किमीपर्यंतची रेंज देण्यास सक्षम आहे. यासोबतच यामध्ये फास्ट चार्जरचाही सपोर्ट देण्यात आला आहे, ज्याच्या मदतीने ते केवळ 1 तासात 0 ते 80 टक्के चार्ज होऊ शकते.

वैशिष्ट्ये
Tata Tiago EV ला Z Connect सह स्मार्टवॉच कनेक्टिव्हिटी, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, मल्टिपल ड्राइव्ह मोड्स, फॉग लॅम्प्स, मल्टी-मोड रीजन फंक्शन, फ्लॅट-बॉटम स्टीयरिंग व्हील, क्रूझ कंट्रोल, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम यांसारखी वैशिष्ट्ये मिळतात.

किती आहे किंमत ?
Tata Tiago EV ही भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार आहे. कंपनीने या नवीन इलेक्ट्रिक कारची एक्स-शोरूम किंमत 8.49 लाख रुपये ठेवली आहे.

Tata Tiago EV ही आहे सेगमेंटमधील पहिली इलेक्ट्रिक कार
टाटा टियागो ही ईव्ही हॅचबॅक सेगमेंटमधील देशातील पहिली इलेक्ट्रिक कार आहे, ज्यामुळे बाजारात अद्याप फारशी स्पर्धा नाही. पण येत्या काळात या सेगमेंटमध्ये इतर इलेक्ट्रिक कार लॉन्च केल्या जाऊ शकतात.