Shubman Gill And Sara Tendulkar : शुभमन आणि साराच्या मैत्रीत दुरावा? इन्स्टाग्रामवर एकमेकांना केले अनफॉलो


भारताने झिम्बाब्वेविरुद्धची एकदिवसीय मालिका 3-0 अशा फरकाने जिंकली. भारतीय संघ जिंकेल अशी आधीच अपेक्षा असली, तरी या मालिकेत शुभमन गिलने जे केले, ते कमी अपेक्षित होते. गिलने तीन सामन्यांच्या मालिकेत 245 धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून तीन उत्कृष्ट खेळी निघाल्या. त्यापैकी एक शतक होते. गिलच्या कारकिर्दीतील हे पहिले शतक होते. 130 धावांच्या शानदार खेळीसह गिलने सचिन तेंडुलकरचा 24 वर्ष जुना विक्रमही मोडला.

मालिकेतील शेवटच्या सामन्यात शतक झळकावल्यानंतर गिल प्रसिद्धीच्या झोतात आला आणि सचिनची मुलगी सारासोबतच्या त्याच्या अफेअरचे किस्से पुन्हा सोशल मीडियावर ट्रेंड करू लागले. युजर्सनी दोघांबद्दल अनेक प्रकारचे मीम्स बनवले.

दरम्यान, सारा आणि शुभमनचे इंस्टाग्राम अकाउंट पाहिले असता दोघेही एकमेकांना फॉलो करत नसल्याचे दिसून आले. मात्र, सारा तेंडुलकरने शुभमनची बहीण शहनील गिलला फॉलो केले आहे. यानंतर दोघांची मैत्री संपली की काय अशी अटकळ बांधली जात आहे.

सारा आणि शुभमन गिल यांच्या अफेअरची अफवा पहिल्यांदा 2019 मध्ये पसरली होती. दोघांनीही यावर कधीही भाष्य केले नसले, तरी त्यांच्या अफेअरच्या बातम्या नेहमीच चर्चेत असतात आणि सोशल मीडियावर या नात्याबद्दल अनेक मीम्स येत आहेत.

2019 मध्ये, शुभमन गिल कोलकाता नाईट रायडर्स संघाचा एक भाग बनला. या सीझननंतर त्याने ‘रेंज रोव्हर’ कार खरेदी केली आणि त्याचा फोटोही इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. साराने या फोटोवर शुभमनचे अभिनंदन केले होते आणि शुभमनने हृदयाच्या इमोजीसह तिचे आभारही मानले होते.

हार्दिक पांड्याने या पोस्टवर मजा केली आणि त्याच्या बाजूने स्वागत आहे अशी टिप्पणी केली होती. या पोस्टवर अनेक चाहत्यांनी दोघांमधील अफेअरला हवाही दिली होती. येथून त्यांच्या अफेअरच्या बातम्या येऊ लागल्या.

मात्र, आता दोघांनी एकमेकांना अनफॉलो केले आहे. अशा परिस्थितीत, असे दिसते की गिल आणि सारा यांच्यात सर्व काही ठीक नाही आणि या अफवांचा त्यांच्या मैत्रीवरही परिणाम झाला आहे.