Raju Srivastava : राजू श्रीवास्तवच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी, 15 दिवसांनी कॉमेडियन आला शुद्धीवर


प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव गेल्या 15 दिवसांपासून रुग्णालयात मृत्युशी झुंज देत आहे. त्याचे कुटुंब आणि मित्रांव्यतिरिक्त त्याचे चाहते देखील त्याच्या आरोग्यासाठी सतत प्रार्थना करत आहेत. प्रत्येकजण आपल्या आवडत्या स्टारच्या लवकरच पुनरागमनाची वाट पाहत आहे. दरम्यान, आता कॉमेडियनशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. राजूचे चाहते आणि त्यांच्या प्रार्थनांचा परिणाम आता दिसून येत आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, 15 दिवसांनंतर राजू श्रीवास्तव अखेर शुद्धीवर आला आहे.

याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना राजू श्रीवास्तव यांचे स्वीय सचिव गरवीत नारंग यांनी सांगितले की, राजू श्रीवास्तव यांना 15 दिवसांनी शुद्ध आली आहे. दिल्लीच्या एम्समधील डॉक्टरांकडून त्यांच्यावर देखरेख करण्यात येत आहे. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.