Good News : सोनम कपूर लग्नाच्या चार वर्षानंतर झाली आई, दिला गोंडस मुलाला जन्म


शनिवारी मनोरंजन विश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरने पहिल्या मुलाला जन्म दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीने एका मुलाला जन्म दिला आहे. अभिनेता रणबीर कपूरची आई नीतू कपूर यांनी स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली. नीतू कपूर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ती अभिनेत्री सोनम कपूर आणि तिचा पती आनंद आहुजा यांच्या वतीने आहे. शेअर केलेल्या पोस्टनुसार, अभिनेत्रीने शनिवारी, 20 ऑगस्ट रोजी एका मुलाला जन्म दिला.

नीतू कपूरने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये लिहिले आहे की 20 ऑगस्ट 2022 रोजी आम्ही आमच्या मुलाचे स्वागत केले आहे. या सुंदर प्रवासात आम्हाला साथ दिल्याबद्दल सर्व डॉक्टर, परिचारिका, मित्र आणि कुटुंबीयांचे आभार. ही फक्त सुरुवात आहे, परंतु आपल्याला माहित आहे की आता आपले जीवन कायमचे पूर्णपणे बदलणार आहे. सोनम आणि आनंद.