
कोलकाता: पश्चिम बंगाल एसटीएफने प्रतिबंधित दहशतवादी संघटना अल कायदाच्या दोन संशयित सदस्यांना उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील सासन येथील खरीबारी भागातून अटक केली आहे. त्यांच्याकडून भारताविरुद्ध युद्ध पुकारणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
West Bengal : बंगालमध्ये अल कायदाच्या दोन संशयित दहशतवाद्यांना अटक, एसटीएफची कारवाई
सासण पोलीस ठाण्यांतर्गत खरीबारी परिसरात एसटीएफने ही कारवाई केली. बुधवारी रात्री दोघांना अटक करण्यात आली. एसटीएफच्या म्हणण्यानुसार, ते भारतीय उपखंडातील प्रतिबंधित दहशतवादी संघटनेचे (AQIS) सक्रिय सदस्य असू शकतात. एसटीएफच्या सूत्रांनी सांगितले की, अब्दुर रकीब सरकार, गंगारामपूर, जिल्हा दक्षिण दिनाजपूर येथील रहिवासी आणि हुगळी जिल्ह्यातील आरामबाग येथील रहिवासी काझी अहसानुल्ला अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
