Emergency First Look : इंदिरा गांधी बनून बॉक्स ऑफिसवर दहशत निर्माण करणार कंगना राणावत, पाहा फर्स्ट लुक


सध्या बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत तिच्या आगामी ‘इमर्जन्सी’ चित्रपटाची जोरदार तयारी करत आहे. चित्रपटाच्या शीर्षकावरून हे स्पष्ट होते की, चित्रपटाची कथा देशातील सर्वात मोठी राजकीय घटना ‘आणीबाणी’ला अगदी जवळून स्पर्श करण्याचा प्रयत्न करेल. कंगना या चित्रपटात दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारत असून आता या चित्रपटाचा फर्स्ट लूकही समोर आला आहे. कंगना इंदिरा गांधींच्या रूपात खूपच आकर्षक दिसत आहे.


कंगनाने तिच्या इन्स्टाग्रामवर ‘इमर्जन्सी’ चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज केला आहे. या फोटोत कंगना ‘इंदिरा गांधी’ यांच्या रुपात पहायला मिळत आहे. पांढरे केस, चेहऱ्यावर हलक्या सुरकुत्या यामध्ये कंगनाचा वेगळा लूक पाहायला मिळत आहे. हा लूक पाहिल्यानंतर कंगना ‘इंदिरा गांधी’च्या भूमिकेत या चित्रपटात थिरकताना दिसणार आहे, असे म्हणता येईल. या पोस्टरसोबत कंगनाने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘आणीबाणीचा फर्स्ट लुक सादर करण्यात आला आहे. जगाच्या इतिहासातील सर्वात शक्तिशाली आणि वादग्रस्त महिलांपैकी एकाचे पोर्ट्रेट.’

या फोटोशिवाय कंगनाने चित्रपटाची झलकही दाखवली आहे. अभिनेत्रीने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये 1971 मधील घटना दाखवण्यात आली आहे. किती अधिकारी इंदिरा गांधींना मॅडमऐवजी ‘सर’ संबोधायचे, हे या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे. या व्हिडीओमध्ये कंगनाच्या लूकपासून ते बोलण्याच्या स्टाईलपर्यंत सर्व काही प्रेक्षणीय आहे.


कधी रिलीज होणार चित्रपट
‘इमर्जन्सी’ हा चित्रपट दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जीवनावर आधारित आहे. कंगना या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. हा चित्रपट 25 जून 2023 रोजी रिलीज होणार आहे. नुकतेच कंगनाने एक पोस्टर शेअर करून तिच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली. कंगना शेवटची ‘धाकड’ चित्रपटात दिसली होती. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच फ्लॉप झाला. या चित्रपटात कंगना जबरदस्त अॅक्शन करताना दिसली होती. असे असूनही कंगनाला प्रेक्षकांना चित्रपटगृहांपर्यंत खेचण्यात यश आले नाही.