Maharashta Crisis : ‘मैं समंदर हूं, लौटकर वापस आऊंगा…’ उद्धव यांच्या राजीनाम्यानंतर फडणवीसांचा जुना व्हिडिओ चर्चेत


मुंबई – 2019 मध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढले आणि निकाल आल्यानंतर महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीचे सरकार स्थापन होईल, असे मानले जात होते. यानंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याची तयारीही जोरात आली होती. मात्र मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारावरून दोन्ही पक्षांमध्ये खडाजंगी झाली. शिवसेनेला आपल्या पक्षातीलच नेता मुख्यमंत्री व्हावा, अशी इच्छा होती, पण भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून दावा करत होता. त्यानंतर जे घडले ते व्हायचेच होते.

दोन्ही पक्षांमधील मतभेद इतके वाढले की राज्यात तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा देऊन सरकार स्थापन केले आणि शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्रीपदासाठी निवड करण्यात आली. यानंतर महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काव्य शैली पाहायला मिळाली. त्यांनी विरोधकांना खास टोला लगावला.


फडणवीसांची जी कविता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे
‘मेरा पानी उतरता देख, मेरे किनारे पर घर मत बसा लेना… मैं समंदर हूं, लौट कर वापस आऊंगा’, असे फडणवीस त्यावेळी म्हणाले होते. ज्या दिवशी फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता, त्याच दिवशी त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही शेरच्या माध्यमातून पुनरागमन करण्याचे म्हटले होते.

भाजपच्या आमदारांनी केले स्वागत
त्याचवेळी फडणवीस यांचा शेर वाचून भाजप आमदारांनी टेबलावर थोपटून त्यांचे स्वागत केले. मात्र, यावेळी सत्ताधारी पक्षाचे अनेक आमदार हसताना दिसले. महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनात फडणवीस यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली होती.