Vodafone Idea Offer : या ग्राहकांना दर महिन्याला मिळणार 100 रुपये, जाणून घ्या संपूर्ण ऑफर


नवी दिल्ली – भारतात 6G आणि 5G ची चर्चा होत असली तरी, आजही देशात 2G नेटवर्कचे लाखो वापरकर्ते आहेत. देशात टूजी मोबाईल वापरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. याचे मोठे कारण म्हणजे हे वापरकर्ते महागडे 4G फोन खरेदी करू शकत नाहीत. यापैकी बरेच वापरकर्ते असे आहेत की त्यांना स्मार्टफोनची देखील गरज नाही, तरी टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या 2G ग्राहकांना सोडले नाही. या आश्वासनासह, व्होडाफोन आयडियाने त्यांच्या काही ग्राहकांना दरमहा 100 रुपये देण्याची घोषणा केली आहे. जाणून घेऊया संपूर्ण ऑफर…

Vodafone Idea ची 4G स्मार्टफोन ऑफर 2G ग्राहकांसाठी
Vodafone Idea च्या या ऑफरबद्दल TelecomTalk ने सर्वप्रथम माहिती दिली आहे. ही ऑफर फक्त 30 जून 2022 पर्यंत वैध आहे. जर तुम्हाला ही ऑफर घ्यायची असेल तर पहिली गोष्ट म्हणजे तुमच्याकडे Vi सिम कार्ड आणि 2G सिम असायला हवे. तसे असल्यास, तुम्हाला कंपनीकडून संदेश येईल किंवा आधीच आला असेल. आता तुम्हाला 4G फोन खरेदी करावा लागेल आणि पहिला रिचार्ज 299 किंवा त्याहून अधिक करावा लागेल.

2400 रुपयांचा कॅशबॅक
यानंतर, तुम्हाला 24 महिन्यांसाठी प्रत्येक महिन्याला 100 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. तुम्ही Vi अॅपमध्ये तुमची कॅशबॅक रक्कम देखील तपासू शकता, जी कूपन विभागात दाखवली जाईल. दरमहा 100 रुपयांचा कॅशबॅक मिळवण्यासाठी, तुम्हाला २४ महिन्यांसाठी २९९ रुपये किंवा त्याहून अधिक रिचार्ज करणे आवश्यक आहे. आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की तुम्हाला 100 रुपयांचा कॅशबॅक कूपनच्या स्वरूपात मिळेल म्हणजेच तुम्ही ते फक्त रिचार्जसाठी वापरू शकता. प्रत्येक कूपनची वैधता 30 दिवस असेल. एकंदरीत, ही योजना त्यांच्यासाठी आहे ज्यांना 2G वरून 4G वर जायचे आहे.