चंदीगढ : पंजाबी गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईची चौकशी करण्यासाठी पंजाब पोलिसांनी दिल्लीतील गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईची साडेपाच तास ट्रान्झिट रिमांडवर चौकशी केली. यावेळी त्यांनी 10 ते 15 प्रश्न विचारले, ज्याची तो फिरवून उत्तरे देत होता.
Moosewala Murder : मुसेवालाशी काय होती दुश्मनी, तुरुंगातून कशी आखली हत्येची योजना ? जाणून घ्या बिष्णोईने काय दिले उत्तर
त्याने कोणतेही समाधानकारक उत्तर न दिल्याने पोलिसांची फसवणूक करण्याचा प्रयत्न सुरूच होता. तिहार तुरुंगात सुद्धा तो तसेच सांगत राहिला. मूसेवालाच्या हत्येवेळी आपण तिहार तुरुंगात बंद होतो, आपल्याला या प्रकरणी काहीच माहिती नाही, असे उत्तर बिष्णोईने दिले.
पहिल्या दिवसाच्या चौकशीत लॉरेन्सकडून कोणतेही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने आता पंजाब पोलिसांनी प्लॅन बी वर काम सुरू केले आहे. याअंतर्गत मुसेवाला हत्येप्रकरणी आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या अन्य गुंडांशी बिश्नोईची ओळख करून दिली जाणार आहे. दोन दिवसांच्या चौकशीत अनेक प्रश्नांचा उलगडा होण्याची आशा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना आहे.
पोलिस सूत्रांनी सांगितले की, बिश्नोईच्या मेडिकलमधील सर्व चाचण्या नॉर्मल आल्या आहेत, त्यानंतरही तो आजारी असल्याची बतावणी करत होता. पहिल्या दिवसाच्या चौकशीत पोलिसांनी बिश्नोईशी कठोर भूमिका घेतली नसली, तरी पुढील चौकशीत त्याने पोलिसांना सहकार्य केले नाही, तर पंजाब पोलिसही कडक कारवाई करू शकतात.
चौकशीत घेतले गोरा याचे नाव
पंजाब पोलिसांच्या चौकशीत बिश्नोईने होशियारपूर तुरुंगात बंद असलेल्या गँगस्टर गोराचे नाव सांगितले आहे. यानंतर पोलिसांनी गुरप्रीत गोरा याला होशियारपूर कारागृहातून खरारला आणले. गोरा हा कॅनडामध्ये बसलेल्या गँगस्टर गोल्डी ब्रारचा मेहुणा असल्याचे सांगितले जाते.
पोलिसांचा या प्रश्नांकडे होता फोकस
- सिद्धू मुसेवालाशी तुझी काय दुश्मनी होती?
- तुरुंगात असताना कशी आखली खुनाची योजना
- हत्येसाठी कोणत्या साथीदारांची घेतली मदत ?
- कोठून आणली गेली AN-94 शस्त्रे ?
- तुरुंगात असताना तु तुझ्या मित्रांशी कसा संवाद साधतो?
- मुसेवाला सोडून तुला आणखी कोणाला मारायचे आहे?
- हत्येपूर्वी केलेल्या रेकीमध्ये कोणाचे सहकार्य घेण्यात आले?
- तुला सुरक्षा कटाबद्दल माहिती आहे का?