तालिबान्याचा नवा फतवा : पती-पत्नी रेस्टॉरंटमध्ये जेवू शकणार नाहीत एकत्र


काबूल – तालिबानने अफगाणिस्तानच्या पश्चिम हेरात प्रांतात लैंगिक भेदभावाची योजना लागू केली आहे. या अंतर्गत पुरुषांना यापुढे फॅमिली रेस्टॉरंटमध्ये कुटुंबातील सदस्यांसोबत जेवण करण्याची परवानगी मिळणार नाही. याशिवाय स्त्री-पुरुषांनाही एकत्र पार्कमध्ये जाण्याची परवानगी नाही.

सदाचाराचा प्रसार आणि वाईट गोष्टींना प्रतिबंध करण्यासाठी मंत्रालयाने लागू केलेला हा नियम पती-पत्नीलाही लागू होईल. एका अफगाण महिलेने सांगितले की, नुकतीच ती तिच्या पतीसोबत हेरात रेस्टॉरंटमध्ये गेली होती. तिथे मॅनेजरने तिला पतीपासून वेगळे बसून जेवायला सांगितले होते.

मंत्रालयाचे अधिकारी रियाझुल्ला सीरत यांनी सांगितले की, हेरातमधील उद्यानांसाठीही असाच आदेश जारी करण्यात आला आहे. त्यानुसार महिला व पुरुषांना वेगवेगळ्या दिवशी उद्यानात जाण्यास सांगण्यात आले आहे. गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार हे महिलांचे दिवस आहेत, तर पुरुषांची उद्याने रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार या दिवशी खुली असतील.