नवी दिल्ली – अंमलबजावणी संचालनालयाने (ED) चायनीज स्मार्टफोन निर्माता कंपनी Xiaomi वर कडक कारवाई करत आहे. शनिवारी या प्रकरणी मोठी कारवाई करत ED ने Xiaomi India Pvt Ltd च्या बँक खात्यांमध्ये जमा केलेले 5551.27 कोटी रुपये जप्त केले. यासंदर्भात जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कंपनीने केलेल्या फसवणुकीप्रकरणी ईडीने विदेशी मुद्रा व्यवस्थापन कायदा, 1999 अंतर्गत ही कारवाई केली आहे.
ED ची मोठी कारवाई: चीनी स्मार्टफोन निर्माता Xiaomi च्या खात्यात जमा 5551 कोटी रुपये केले जप्त
भारतात Mi ब्रँडसह करत आहे व्यवसाय
कंपनी Mi ब्रँड नावाने भारतात मोबाईल फोनचा व्यवसाय करते. शनिवारी केलेल्या कारवाईची माहिती देताना, ईडीने सांगितले की, Xiaomi India ही चीनस्थित Xiaomi समूहाची संपूर्ण मालकीची कंपनी आहे. एजन्सीने सांगितले की, फेब्रुवारी 2022 मध्ये चीनी फर्मने परदेशात पाठवलेल्या कथित बेकायदेशीर रकमेच्या संदर्भात कंपनीविरुद्ध चौकशी सुरू करण्यात आली होती. यानंतर, खात्यांमध्ये जमा केलेली रक्कम परकीय चलन व्यवस्थापन कायदा (FEMA) च्या संबंधित कलमांतर्गत जप्त करण्यात आली आहे.
2015 पासून सुरुवात केली पैसे पाठवायला
अहवालानुसार, Xiaomi इंडियाने 2014 मध्ये देशात आपले कामकाज सुरू केले आणि 2015 पासून पैसे पाठवण्यास सुरुवात केली. कंपनीने तीन विदेशी कंपन्यांना रॉयल्टीच्या नावाखाली 5551.27 कोटी रुपयांचे परकीय चलन पाठवले. या कंपन्यांमध्ये Xiaomi ग्रुपच्या एका घटकाचे नाव देखील समाविष्ट आहे. रॉयल्टीच्या नावावर ही मोठी रक्कम शाओमी ग्रुपच्या संस्थांच्या सूचनेनुसार पाठवण्यात आली होती, तर इतर दोन कंपन्या अमेरिकन होत्या.