मुंबई – मुंबईतील ऑर्केस्टा आणि डान्स बार मालकांमध्ये मुंबई पोलिसांबाबत नाराजीचे वातावरण पाहायला मिळत आहे. बार आणि रेस्टॉरंट मालकांकडून मुंबई पोलिसांवर खंडणी उकळल्याचा आरोप होऊन एक वर्षही उलटले नाही आणि आता पोलिसांवर रेस्टॉरंट मालकांना त्रास देण्याचे आरोप होत आहेत. मुंबईतील असे अनेक बार मलिक आहेत, ज्यांचा असा आरोप आहे की, त्यांच्या बारमध्ये पोलीस येतात, बसतात आणि काहीवेळा सोफ्यावर झोपतात, ज्यामुळे त्यांच्या ग्राहकांवर याचा परिणाम दिसून येत आहे. काही मालकांचा असा आरोप आहे की पहाटे 1.30 च्या मुदतीपूर्वी त्यांचे बार बंद करण्यास सांगितले जाते.
मुंबई पोलिसांवर ऑर्केस्टा-डान्स बारमालकांचा गंभीर आरोप
त्याचरोबर काही डान्सबार मालकांचा असा दावा आहे की, त्यांच्याकडे जे पोलीस येतात आणि त्यांना त्रास देतात, आणि म्हणतात की, त्यांना त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने हा आदेश दिला आहे. ते ज्याचे पालन करत आहेत. एकूण 259 ऑर्केस्ट्रा आणि डान्स बार मुंबईत आहेत. याबाबत आहारकडे (AHAR) बारमालकांनी तक्रार केली आहे आणि त्यांच्या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, कोरोनाचा हॉटेल उद्योगाच्या कमाईवर लक्षणीय परिणाम झाला आहे आणि महाराष्ट्र सरकारने सर्व निर्बंध उठवले असतानाही हा परिणाम दिसून येत आहे
बारमालकांनी आपल्या फिर्यादीत पुढे म्हटले आहे की, आमचा व्यवसाय आम्हालाही सुरू करण्यास सांगितले होते, पण आम्हाला स्थानिक पोलिसांकडून खूप त्रास होत आहे. तक्रारीत उदाहरण देताना म्हटले आहे की, रात्री नऊ वाजल्यापासूनच पोलीस फेऱ्या मारायला लागतात. नर्तक आणि गायकांचे फोटो पोलीस काढू लागतात, त्याचा व्यवसायावर खूप वाईट परिणाम होतो आणि ग्राहकही खूप घाबरले आहेत, त्यामुळे ते जास्त वेळ न घालवता लवकर निघून जातात. दुसऱ्या एका हॉटेल व्यापाऱ्याने सांगितले की, अनेकवेळा पोलीस गणवेशात येतात आणि सोफ्यावर झोपून जातात.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, असा कोणताही आदेश आम्ही दिलेला नाही किंवा कोणतेही हॉटेल, रेट्रोरेंट, बार आणि ऑर्केस्ट्रा मुदतीपूर्वी बंद करण्यास आम्ही सांगितले नाही. पोलीसांना आम्ही कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार करू नये, असे सांगितले आहे आणि जर पोलिसांनी कोणत्याही व्यावसायिकाला त्रास दिला असेल, तर ते तक्रार करू शकतात ज्याची गंभीर दखल घेतली जाईल.