ग्रॅमी पुरस्कार आयोजकांवर भडकली कंगना राणावत


लास वेगासमधील एमजीएम ग्रँड गार्डन एरिना येथे 64 वा ग्रॅमी पुरस्कार सोहळा काही दिवसांपूर्वी पार पडला. संगीत क्षेत्रामधील अनेक कलाकारांना या सोहळ्यात पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. भारतातील प्रसिद्ध संगीतकार रिकी केज आणि फाल्गुनी शाह यांना देखील ग्रॅमी पुरस्कार पटकवला आहे.

पण, याबाबत अभिनेत्री कंगना राणावतने देखील एक पोस्ट शेअर करून लोकांना या पुरस्काराचा निषेध करण्यास सांगितले आहे. प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांना ऑस्कर आणि ग्रॅमी या दोन्ही पुरस्कारांच्या सोहळ्या दरम्यान श्रद्धांजली वाहण्यात न आल्यामुळे कंगना भडकली आहे.

सोशल मीडियावर कंगनाने याबाबतची पोस्ट शेअर केली होती. तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले, अशा लोकल पुरस्कारांचा निषेध करा. हे पुरस्कार आंतरराष्ट्रीय असण्याचा दावा करतात, पण दिग्गज लोकांना हे विसरतात. ऑस्कर आणि ग्रॅमी या दोन्ही पुरस्कारांना लता मंगेशकर यांचा विसर पडला.

वेगवेगळ्या विषयांवर कंगना आपले मत सोशल मीडियावर मांडत असते. ती सध्या लॉक-अप या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. या कार्यक्रमाचे ती सूत्रसंचालन करते. या शोमुळे सध्या ती चर्चेत आहे. कंगनाच्या पंगा, क्विन आणि तन्नू वेड्स मनु या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. तसेच तिचा धाकड हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.