पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा कडाडले


नवी दिल्ली – एक दिवस स्थिर राहिल्यानंतर आज पुन्हा देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात देशात प्रत्येकी 80 पैशांनी वाढ झाली आहे. मुंबईत एक लिटर पेट्रोलचा दर 117.57 रुपये प्रतिलीटर आणि डिझेलचा दर 101.70 रुपये प्रतिलीटरवर पोहोचला आहे. तसेच दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत आता 102.61 रुपये प्रतिलीटर आणि डिझेलची किंमत 93.87 प्रतिलीटरवर पोहोचली आहे. पेट्रोल-डिझेलचे दर 31 मार्च रोजी प्रतिलीटर 80 पैशांनी महागले होते. त्यानंतर आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 1 एप्रिल रोजी इंधन दर स्थिर होते.

इंधन दरात वाढ होण्यास चार महिन्यांहून अधिक कालावधीनंतर 22 मार्चपासून सुरुवात झाली आहे. त्यानंतर पेट्रोल-डिझेलची दरवाढ कायम आहे. त्यानंतर गेल्या 12 दिवसांत इंधन दहाव्यांदा पेट्रोल-डिझेल महाग झाले आहे. अलिकडे कच्च्या तेलाच्या किमती 35 ते 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. भारतातील 85 टक्के इंधन पुरवठा आयातीवर अवलंबून आहे.

देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या आहेत, परंतु स्थानिक करानुसार त्यांच्या किमती वेगवेगळ्या राज्यांमध्ये बदलतात. क्रिसिल रिसर्चच्या मते, आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतींवर पूर्णपणे मात करण्यासाठी प्रति लिटर 9 ते 12 रुपयांची वाढ आवश्यक आहे. तेलाची गरज भागवण्यासाठी भारत 85 टक्के आयातीवर अवलंबून आहे.