अॅपल, सॅमसंग भारतात ३७ हजार कोटीचे स्मार्टफोन उत्पादन या वर्षात करणार

अॅपल, सॅमसंग वित्तवर्ष २०२१-२२ मध्ये सरकार उत्पादन आधारित प्रोत्साहन योजनेअंतर्गत (पीएलआय) सुमारे ५ अब्ज डॉलर्स (३७ हजार कोटी) चे स्मार्टफोन बनविणार आहे. केंद्राने ठरवून दिलेल्या लक्ष्याच्यापेक्षा ही संख्या ५० टक्के जास्त आहे. भारतात बनविलेल्या ५ अब्ज डॉलर्सच्या स्मार्टफोन पैकी २ अब्ज किमतीचे स्मार्टफोन निर्यात केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. पीएलआय योजनेनुसार कंपनीला ५ वर्षात ३९ हजार कोटी प्रोत्साहन दिले जाणार आहे. या योजनेचा मुख्य उद्देश भारताला मॅन्यूफॅक्चरिंग हब (उत्पादन केंद्र) बनविणे हा आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गतवर्षी मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रोनिक मॅन्यूफॅक्चरिंग साठी पीएलआय योजना २०२५-२६ पर्यंत वाढविली होती. इंडिया सेल्युलर अँड इलेक्ट्रोनिकस असोसिएशनचे अध्यक्ष पंकज मोहिंदू म्हणाले अॅपल साठी विस्ट्रान व पेगाट्रान समेत सॅमसंग चालू वर्षात ५ अब्ज डॉलर्स किमतीच्या उत्पादनाचे लक्ष्य गाठणार आहे. याचा उद्देश देशातच प्रचंड प्रमाणावर मोबाईल उत्पादन व्हावे हा आहे.

अॅपल, सॅमसंग मेड इन इंडिया स्मार्टफोनची निर्यातही करत आहेत. २०२१ मध्ये अॅपलने ब्रिटन २७, जपान २४, नेदरलंड २३, जर्मनी ७, इटली, तुर्की प्रत्येकी ४, युएई २ टक्के निर्यात केली आहे तर सॅमसंगने युएई ४७, रशिया १२, द.आफ्रिका ७, जर्मनी ५, मोरोक्को व ब्रिटनला ३ टक्के निर्यात केली आहे.