वयस्क व्यक्तींमध्ये आढळणाऱ्या अल्झायमरवर केशर उपयुक्त

Alzheimer2
वाढत्या वयाबरोबर अनेक विकारही मनुष्याच्या बाबतीत वाढीला लागतात. म्हातारपणी स्मरणशक्ती दुर्बल करणारा विकार म्हणजे अल्झायमर हा आजार. या आजाराचे प्रमाण जसजसे वाढत जाते, तशी रुग्णाची स्मरणशक्ती घटत जाते. कालांतराने स्वतःची दैनंदिन कामे कशी केली जातात याचाही रुग्णाला विसर पडतो. या विकारावर केशर उपयुक्त असल्याचा दावा नुकताच ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटिग्रेटेड मेडिसिन’च्या शास्त्रज्ञांनी केला आहे.
Alzheimer1
आजकालच्या वयस्क लोकांमध्ये अल्झायमरचे वाढते प्रमाण दिसत असून, २०५० सालापर्यंत जगातील ४.५ मिलियन वृद्ध या आजाराने ग्रस्त असणार असल्याचा वैज्ञानिकांचा कयास आहे. म्हणूनच हा विकार वयस्क लोकांमध्ये कमी कसा करता येऊ शकेल या प्रश्नांवर शास्त्रज्ञ अव्याहत काम करीत आहेत. जम्मू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटिग्रेटेड मेडिसीनच्या शास्त्रज्ञांना केशरामध्ये अशी काही रासायनिक तत्वे सापडली आहेत, ज्यांच्यामुळे मेंदूतील कोशिका निरोगी आणि सुदृढ राहण्यास मदत मिळत आहे. मेंदूच्या कोशिका निरोगी राहिल्याने अल्झायमर सारखे ‘डीजनरेटिव्ह’ आजारही दूर होण्यास मदत मिळत असल्याचे निदान शास्त्रज्ञांनी केले आहे.
Alzheimer
याबाबतीत अनेक चाचण्या आणि परीक्षणे केल्यानंतर शास्त्रज्ञांनी आपली निदाने औपचारिक रित्या जाहीर केली असून, आता केशराचा वापर करून टॅबलेट्स तयार करण्याचे काम सुरु झाले असून, या गोळ्या अंतिम परीक्षणांच्या नंतर लवकरच भारतीय औषध बाजारपेठेमध्ये उपलब्ध होणार असल्याचे समजते. या गोळ्या चाळीस वर्षे वयाच्या पुढील लोकांसाठी असून, यंदाच्या वर्षाखेर पर्यंत बाजारामध्ये उपलब्ध होणे अपेक्षित आहे. या गोळ्यांच्या सेवनाने मेंदूच्या कोशिका निरोगी राखण्यास मदत होणार असून, अल्झायमर सारखे आजार दूर ठेवता येणार आहेत.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment