लिंबाच्या रसाप्रमाणे व गराप्रमाणे सालीचाही करा वापर

lemon

लिंबाचा किंवा लिंबाच्या रसाचा वापर जगभरातील खाद्यसंस्कृतीमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जात असतो. लिंबे आहारामध्ये वापरली गेली, तर त्यांचा आरोग्यासाठी होणारा उपयोगही मोठा आहे. लिंबाच्या रसाच्या पेक्षा लिंबाच्या सालीमध्ये पौष्टिक तत्वे अधिक आहेत. त्यामुळे लिंबाच्या गराचा आणि रसाचा वापर केला जातानाच त्या सोबत लिंबाच्या सालीचा वापर केला जाणे अगत्याचे आहे.
lemon2
लिंबामध्ये जीवनसत्वे, लोह, झिंक, पोटॅशियम, फायबर आणि प्रथिनेही आहेत. त्या पौष्टिक तत्वांच्या खेरीज लिंबामध्ये असलेली फ्लॅवेनॉइड्स, आणि लिमोनॉईड्स शरीराच्या कोशिका बळकट करून, फ्री रॅडीकल्सना लढा देऊन अनेक व्याधींपासून शरीराचा बचाव करीत असतात. लिंबामध्ये असलेले सायट्रिक अॅसिड शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढविणारे असून, यामध्ये २२ पेक्षाही अधिक कर्करोगप्रतिरोधी तत्वे आहेत.
lemon1
लिंबाचा गर आणि लिंबाच्या रसासोबत लिंबाच्या सालीचे सेवनही उत्तम आहे. लिंबाचे सेवन सालीसकट करण्याकरिता लिंबे फ्रीझरमध्ये गोठवून त्यांचा वापर करावा. लिंबे फ्रीझरमध्ये गोठविण्याकरिता आधी ताजी लिंबे स्वच्छ धुवून घ्यावीत, व पुसून पूर्णपणे कोरडी करावीत. त्यानंतर ही लिंबे एका झिपलॉक पिशवीमध्ये घालून काही तासांकरिता फ्रीझरमध्ये ठेवावीत. काही तासांच्या अवधीनंतर लिंबे गोठून कडक होतात. ही गोठवून कडक झालेली लिंबे आपल्या चहामध्ये, इतर पेयांमध्ये किसून घालावीत किंवा ज्यूस बनविताना भाज्या आणि फळांच्या सोबत संपूर्ण लिंबे घालावीत. जर लिंबे गोठवून वापरायची नसतील, तर ताज्या लिंबाची साल आपण खात असलेल्या सॅलडवर, सरबतांमध्ये किसून घातली जाऊ शकते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment