रात्री झोपताना कॉन्टॅक्ट लेन्सेस घालणे डोळ्यांसाठी ठरू शकते अपायकारक

lense
आपण जर कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरत असाल तर रात्री झोपण्यापूर्वी लेन्सेस काढून ठेवणे डोळ्यांच्या आरोग्याच्या दृष्टिने महत्वाचे आहे. या लेन्सेस रात्री झोपतानाही घातल्या गेल्या तर डोळ्यांमध्ये इन्फेक्शन होण्याचा धोका उद्भवतो. जर हे इन्फेक्शन हाताबाहेर गेले, तर यामुळे अंधत्व देखील येऊ शकत असल्याचे तज्ञ म्हणतात. ‘annals of emergency medicine’ नामक वैद्यकीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या माहितीच्या अनुसार लेन्सेस वापरत असताना डोळ्यांची व्यवस्थित काळजी घेतली गेली नाही, तर याचे मोठे दुष्परिणाम उद्भवू शकतात. अमेरिकेतील न्यू मेक्सिको विद्यापीठामध्ये कार्यरत असलेल्या तज्ञांनी हे निदान केले आहे.
lense1
लेन्सेस वापरत असताना योग्य काळजी न घेतल्याने किंवा रात्री झोपताना देखील लेन्सेस घालून ठेवल्याने डोळ्यातील ‘कॉर्निया’ मध्ये इन्फेक्शन होऊन ‘मायक्रोबियल केराटायटीस’ सारखे विकार उद्भवू शकतात. तसेच इन्फेक्शनच्या सोबतीने कायमचे अंधत्वही येण्याचा धोका उत्पन्न होत असल्याचे तज्ञ म्हणतात. लेन्सेस घालून रात्रीच्या वेळो झोपणे धोकादायक आहेच, त्याखेरीज लेन्सेस घालून एखादी डुलकी काढणेही तितकेच धोकादायक असल्याचे तज्ञ सांगतात.
lense2
या बाबतीत या तज्ञांनी अनेक केसेस हाताळल्या असून, एक रुग्ण डोळे सतत लालसर असल्याची आणि दृष्टी अंधुक झाल्याची तक्रार घेऊन आला असता, तो काही दिवस लेन्सेस घालूनच झोपत असल्याचे आणि पोहण्यासाठी जात असल्याचे निष्पन्न झाले. परिणामी त्याच्या डोळ्यांमध्ये मायक्रोबियल इन्फेक्शन झाले. दुसऱ्या केसमध्ये एक तरुणी, डॉक्टरांच्या सल्ल्याविना, स्वतः होऊन लेन्सेसचा वापर करीत असून, त्यामुळे तिच्या डोळ्यांमध्ये ‘कॉर्नीयल अल्सर’ होऊन डोळ्यांना कायमस्वरूपी इजा झाल्याचे तज्ञ सांगतात. त्यामुळेच लेन्सेसचा वापर करीत असलेल्या प्रत्येक व्यक्तीने त्यांची व्यवस्थित काळजी घेणे आवश्यक आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment