मद्यपानाचे व्यसन दूर करण्यासाठी कालेश्वर मुद्रा उपयुक्त

mudra
मद्यपानाचे व्यसन अनेक गंभीर समस्यांना जन्म देणारे असते. लिव्हर सिरोसीस सारखे आजार, कामामध्ये अकार्यक्षमता वाढणे, नकारात्मक व्यवहार, अश्या अनेक समस्यांना मद्यपानाच्या आहारी गेलेल्या व्यक्तीला तोंड द्यावे लागते. याचे दुष्परिणाम केवळ या व्यक्तीलाच नाही, तर त्याच्या परिवारातील सदस्यांना देखील अडचणीत टाकणारे असतात. यावर उपाय योगशास्त्रामध्ये सांगितला असून, मद्यपानाच्या व्यसनापासून मुक्तता मिळविण्यासाठी योगशास्त्रामध्ये कालेश्वर मुद्रा सांगितली गेली आहे. या मुद्रेचा नियमित सराव केल्याने व्यसन दूर होण्यास मदत होत असून, त्यामुळे व्यक्तीचे मन सकारात्मक होऊ लागते.
mudra1
या मुद्रेचा सराव करण्यासाठी दोन्ही हातांचे अंगठे आणि मधल्या बोटांचे अग्रभाग आपसात जुळवावेत. त्यानंतर तर्जनी, अनामिका आणि कनिष्ठा ही बोटे एकमेकांना जुळतील अश्या प्रकारे दुमडावीत. दोन्ही हातांचे अंगठे छातीच्या दिशेकडे असावेत. हात कोपरांमध्ये हलके वाकलेले असावेत. ही मुद्रा करून त्यांनतर दीर्घ श्वास घ्यावा. श्वास काही क्षण रोखून धरावा. आणि त्यानंतर श्वास सावकाश सोडवा. या मुद्रेचा सराव दररोज पंधरा मिनिटे केल्याने लाभ होतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment