असा असेल भविष्यकाळामध्ये आपला आहार

food
जगभरातील वाढत्या लोकसंख्येमुळे सर्वांसाठी अन्नाची आपूर्ती करणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. त्याचप्रमाणे रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे, प्रदूषणामुळे, पाण्याच्या कमतरतेमुळे जमिनीची उत्पादन क्षमता देखील कमी होत चालली आहे. म्हणूनच आता असे नवनवे अन्नपदार्थ विकसित करण्यात येत आहेत, ज्यांच्यामुळे जगातील वाढत्या लोकसंख्येला अन्नाची पूर्ती करण्यासाठी हे पदार्थ वापरता येणे शक्य होणार आहे. हे पदार्थ भविष्यकाळामध्ये जगभरामध्ये सर्वांच्याच आहाराचा भाग बनणार आहेत. प्राण्यांना मारून त्यांच्यापासून मांस मिळविण्याऐवजी आता अनेक रासायनिक प्रयोगशाळांमध्ये प्राण्यांच्या कोशिका कृत्रिम रित्या तयार करून त्यांपासून, मनुष्यांना खाता येईल अश्या प्रतीचे मांस तयार केले जात आहे. या रासायनिक प्रयोगशाळांना ‘मीट ब्र्यूअरिज’ म्हटले जात असून, या प्रयोगशाळांमध्ये मांस कृत्रिम रित्या तयार करण्यात येत आहे.
food1
‘क्रिकेटस्’ नामक किद्यांमध्ये प्रथिनांचे प्रमाण मुबलक असून, यामध्ये इतर कोणत्याही प्रकारच्या मांसाच्या मानाने प्रथिनांची संख्या तिप्पट जास्त आहे. अश्या या किड्यांचा वापर करून आता शरीराला आवश्यक असणारी प्रथिने देण्यासाठी ‘प्रोटीन बार्स’ तयार करण्यात येत आहेत. जगभरामध्ये आजच्या काळामध्ये दोन मिलियनपेक्षा जास्त लोकसंख्येच्या आहारामध्ये कीटकांचा समावेश आधीपासूनच झालेला असून, ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे भविष्यकाळामध्ये कीटक मानवी आहाराचा अविभाज्य भाग बनणार असल्याचे चिन्ह आहे.
food2
भोजन बनविताना तेलाचा वापर आवर्जून केला जातोच. निरनिरळ्या देशांमध्ये निरनिराळ्या प्रकारची तेले वापरली जात असतात. पण आता वैज्ञानिकांनी झाडांवरील ‘अल्गी’ पासून खाद्यतेल तयार करण्यात यश मिळविले असून, या तेलाचे उत्पादन मानवी आहाराच्या दृष्टीने तसेच पर्यावरणाच्या दृष्टीने देखील अतिशय उपयुक्त ठरत आहे. त्यामुळे भविष्यकाळामध्ये निरनिराळ्या तेलबियांपासून खाद्यतेले बनविली जाण्याच्या ऐवजी अल्गी ऑइलचा वापर जास्त प्रमाणात केला जाईल.

Leave a Comment