कोका कोलाचे असेही उपयोग

coca
कोका कोला हे पेय बहुतेकांच्या पसंतीचे आहेच, पण केवळ उन्हाळ्यामध्ये आवडीने प्यायल्या जाणाऱ्या या पेयाचे आणखीही अनेक उपयोग आहेत. आपल्यापैकी बहुतेकांना मनापासून आवडणारे हे पेय आणखी कशा प्रकारे उपयोगात आणले जाऊ शकते हे जाणून घेऊ या. अनेकदा एखादा बारीकसा किडा जरी चावला, तरी त्या ठिकाणी भयानक खाज सुटते, आगही होऊ लागते. अश्यावेळी थोडासा कोका कोला त्या ठिकाणी लावल्याने त्वचेची आग होणे कमी होते. कित्येकदा रस्त्यातून चालत जात असताना रस्त्यावर पडलेले च्युईंग गम बुटाला किंवा चपलेला चिकटते आणि काही केल्या निघत नाही. अश्या वेळी च्युईंग गम चिकटलेल्या बुटाच्या तळव्यावर कोका कोला शिंपडून ठेऊन काही मिनिटे ठेवावे. त्यानंतर हे च्युईंग गम सहज निघून आल्याचे दिसून येईल. कपड्यांवर किंवा केसांमध्ये च्युईंग गम लागले असल्यासही हा उपाय अवलंबावा.
coca1
घरामध्ये रंगकाम चाललेले असले, तर घरातील लहान मोठ्या वस्तूंवर या रंगाचे शिंतोडे उडून डाग पडू शकतात. विशेषतः लोखंडी वस्तूंवर रंगाचे डाग पडले तर हे डाग निघणे काहीसे कठीण होऊन बसते. अश्या वेळी कोका कोलाच्या मदतीने हे डाग सहज निघू शकतात. त्याचप्रमाणे स्वयंपाकामध्ये वापरण्यात येणाऱ्या भांड्यांवर कालांतराने काळसर थर जमा होऊ लागतो. विशेषतः कढई किंवा तव्यावर अश्या प्रकारचा काळसर थर दिसून येतो. अश्यावेळी या भांड्यामध्ये कोका कोला घालून चांगली उकळी काढावी आणि त्यानंतर हे भांडे घासावे. त्याने भांडे पुन्हा चमकू लागते.
coca2
पित्त किंवा गॅसेसचा त्रास होत असल्यास थंडगार कोका कोलाच्या सेवनाने त्वरित आराम मिळतो. त्यांचप्रमाणे उचकी थांबत नसल्यासही घोटभर कोका कोलाच्या सेवनाने आराम मिळू शकतो. जर आपण वापरत असलेले पाणी खारे (hard water deposits) असेल, तर कालांतराने बाथरूमच्या टाईल्सवर किंवा बेसिनवर पिवळसर डाग दिसू लागतात. कितीही साबणाचा वापर केला तरी हे डाग निघत नाहीत. अश्यावेळी कोका कोला एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये घालून डागांवर शिंपडावे, आणि काही मिनिटांनी पाण्याने धुवून काढावे. डाग नाहीसे झालेले दिसतील.

Leave a Comment