ही तथ्ये अविश्वसनीय तरीही वास्तव

fact
सत्य कल्पनेपेक्षा अधिक अविश्वसनीय असते असे म्हणतात. आणि म्हणूनच आपल्याला अनेकदा अगदी अविश्वसनीय वाटणाऱ्या गोष्टी सत्य ठरतात आणि आपल्या आश्चर्याला पारावार उरत नाही. याचे एक उदाहरण पाहू या. जागतिक पातळीवर प्रतिष्ठत समजले जाणारे ऑक्सफर्ड विद्यापीठ नेमके कधी स्थापिले गेले याची खात्रीशीर माहिती उपलब्ध नाही. पण या बद्दल जे संदर्भ उपलब्ध आहेत, ते विचारात घेता ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये शिक्षणाचे कार्य इसवी सन १०९६ सालापासून सुरु आहे ! हे वास्तव लक्षात घेता जगातील सर्वात प्राचीन विद्यापीठांपैकी एक असल्याचे लक्षात येते. किंबहुना ऐतिहासिक अॅझटेक संस्कृती पेक्षाही या विद्यापीठाचा इतिहास प्राचीन आहे !
fact1
जगातील सर्वात कोरडे ठिकाण म्हटले की जगभरातील विशालकाय वाळवंट असलेले प्रदेश आपल्या डोळ्यांसमोर उभे राहतात. पण वास्तविक जगातील सर्वात कोरडे ठिकाण अंटार्क्टिका येथे आहे. या ठिकाणाला ‘ड्राय व्हॅलीज’ या नावाने ओळखले जात असून, गेल्या अनेक शतकांपासून येथे पाऊस पडलेलाच नाही. य ठिकाणी असलेला लेक बॉनी नामक तलाव बर्फाच्छादित असून, यामध्ये तीन ते पाच मीटरच्या खोलीवर केवळ बर्फच पहावयास मिळतो. सुमारे ४,८०० किलोमीटरच्या क्षेत्रामध्ये या ड्राय व्हॅलीज चा विस्तार आहे.
fact2
केळे या फळामध्ये पोटॅशियमचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे समजले जाते. मात्र केळ्यापेक्षा अधिक पोटॅशियम अॅव्होकाडो मध्ये आहे. केळ्यामध्ये असते त्यापेक्षा दुप्पट पोटॅशियम अॅव्होकाडोमध्ये असते. तसेच यामध्ये के जीवनसत्वाचे प्रमाणही भरपूर आहे. तसेच यामध्ये ब६ जीवनसत्व, क जीवनसत्व, आणि फोलिक अॅसिडचे प्रमाणही मुबलक आहे. यामध्ये कर्करोगप्रतिरोधी तत्वेही आहेत. म्हणूनच अॅव्होकाडोला आजच्या काळातील सुपर फूड म्हटले जाते. याच्या सेवनाने दृष्टीदोष दूर होत असून, वजन घटविण्यासही याचे सेवन सहायक आहे.

Leave a Comment