‘सूर्यवंशी’चे पहिले गाणे तुमच्या भेटीला


लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमार आणि कतरिन कैफ यांचा बहुचर्चित, बहुप्रतिक्षित ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट येणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख कोरोनामुळे गेल्या काही महिन्यांपासून पुढे ढकलण्यात येत होती. पण आता अखेर हा चित्रपट ५ नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे. दरम्यान, चित्रपटातील पहिले गाणे नुकतेच रिलीज करण्यात आले आहे.


आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘सूर्यवंशी’ या चित्रपटातील पहिले गाणे अक्षय कुमारने शेअर केले आहे. या गाण्याचे बोल ‘आयला रे आयला’ असे असून अक्षयच्या ‘खट्टा मिठ्ठा’ या चित्रपटातील हे गाणे आहे. अक्षय कुमार, अजय देवगण आणि रणवीर सिंह हे तिघेही या गाण्यात दिसत आहेत. अक्षयने हे गाणे शेअर करत, जेव्हा सिंघम, सिंबा आणि सुर्यवंशी एकत्र येतात तेव्हा उत्सव होतो, या आशयाचे कॅप्शन दिले आहे. हे गाणे नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. एवघ्या काही मिनिटांमध्ये गाण्याला लाखांहून अधिक नेटकऱ्यांनी हे गाणे पाहिले आहे.

‘सुर्यवंशी’च्या प्रमोशनला आजपासून सुरुवात झाली आहे. तर २४ ऑक्टोबरला चित्रपटातील दुसरे गाणे रिलीज करण्यात येणार आहे. हे गाणे अक्षय कुमार आणि कतरिना कैफ या दोघांवर चित्रित करण्यात आले आहे. शुक्रवारी १५ ऑक्टोबरला दसऱ्याच्या शुभमुहर्तावर सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टीफिकेशन (CBFC) सीईओ रविंद्र भाकड यांना ‘सूर्यवंशी’ चित्रपट दाखवण्यात आला. हा चित्रपट पाहिल्यानंतर सेन्सॉर बोर्डाकडून त्याला U/A सर्टिफिकेट मिळाले आहे. तसेच या चित्रपटातील कोणाताही सीन वगळला किंवा कापला जाणार नाही, असेही सेन्सॉर बोर्डाने सांगितले आहे.