यामुळे तृणमूल काँग्रेसने मोदींची केली जेम्स बॉण्डशी तुलना


कोलकाता – तृणमूल काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जेम्स बॉण्ड असल्याचे म्हटले आहे. मोदींना अचानक जेम्स बॉण्ड भाजपच्या मुख्य विरोधी पक्षांपैकी एक असणाऱ्या तृणमूलने का म्हटले असले असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. तर हॉलिवूडमधील या गुप्तहेराची उपमा मोदींना तृणमूलने देण्यामागे कारण आहे, क्रमांक म्हणजे, ००७ या पात्राची ओळख आहे.

फेसबुकवर पंतप्रधान मोदींसंदर्भातील एक फोटो तृणमूलचे वरिष्ठ नेते देरेक ओब्रायन यांनी पोस्ट केला आहे. यामध्ये पंतप्रधान मोदी सूटाबुटात दाखवण्यात आले असून ते बॉण्डच्या पोजमध्ये आहेत. या फोटोवर ‘ते मला ००७’ म्हणतात, असे लिहिण्यात आले आहे. खाली या ००७ चे स्पष्टीकरण देताना, शून्य विकास, शून्य आर्थिक विकास आणि आर्थिक नियोजनामधील गोंधळाची सात वर्षे, असेही लिहिलेले आहे.

जेम्ब बॉण्डला चित्रपटांमध्ये हा क्रमांक देण्यामागे एक खास कारण आहे. कारण ‘००’ बॉण्ड हा एजंट आहे. म्हणजेच त्याला आपल्या मोहिमेदरम्यान शत्रूला ठार करण्याची परवानगी आहे. तर अशाप्रकारची खास परवानगी मिळालेला तो सातवा एजंट असल्यामुळे त्याला ‘००७’ क्रमांकाने ओळखले जाते. पण तृणमूलने याच क्रमांकाचा वेगळा अर्थ लावत मोदींना ‘००७’ म्हटले आहे. याच वर्षी पंतप्रधान मोदींनी सत्तेत सात वर्षे पूर्ण केली.

मोदींवर टीका करणाऱ्या या पोस्टमध्ये तृणमूलमध्ये आर्थिक विकाससंदर्भातील उल्लेख केला असला तरी घटनांचा उल्लेख केलेला नाही. पण तृणमूलने नोटबंदी, जीएसटीसारख्या मुद्द्यांवरुन यापूर्वी सरकारवर टीका केली आहे. तर सध्या इंधनाचे दर ही सर्वात मोठी समस्या चर्चेत आहे.