महिला आर्थिक विकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न लवकरच मार्गी लावणार – यशोमती ठाकूर


मुंबई : महिला आर्थिक विकास महामंडळ ही राज्यातील महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी काम करणारी, त्यांना सक्षम करणारी महत्त्वाची यंत्रणा आहे. या महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न लवकर मार्गी लावण्यात येतील, असे महिला व बाल विकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी सांगितले.

‘माविम’मध्ये कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीमध्ये वाढ करणे, तेजस्विनी उपक्रमा दरम्यान १० टक्के असलेली वेतनवाढ कमी करुन ३ टक्के करण्यात आली होती. नवतेजस्विनी अंतर्गत पुन्हा १० टक्के वाढ लागू करणे आदी प्रश्नांवर यावेळी चर्चा झाली. महिला ब बाल विकास विभाग या न्याय्य मागण्यांबाबत सकारात्मक असून हे विषय पूर्णत्वास नेणे बाबत संबंधितांनी तातडीने प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश यावेळी ॲड.ठाकूर यांनी दिले.