अजय देवगण आणि बेअर ग्रील्सच्या ‘इंटू द वाइल्ड विथ बेअर ग्रील्स’ शोचा ट्रेलर रिलीज


‘इंटू द वाइल्ड विथ बेअर ग्रील्स’ छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, सुपरस्टार रजनीकांत, अक्षय कुमार यांनी या शोमध्ये हजेरी लावली होती. आता त्यांच्यानंतर आता अभिनेता अजय देवगण देखील या शोमध्ये दिसणार आहे. अजय देवगण आणि बेअर ग्रील्स यांना एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहे. ‘इंटू द वाइल्ड विथ बेअर ग्रील्स’ शोच्या आगामी भागाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे.


‘इंटू द वाइल्ड विथ बेअर ग्रील्स’चा ट्रेलर ‘डिस्कव्हरी प्लस’ने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. ट्रेलरच्या सुरुवातीलाच ‘यै कोई खेल नही है ब्रो’ असे बोलताना अजय दिसत आहे. २२ ऑक्टोबर रोजी अजय देवगणचा हा एपिसोड रिलीज होणार आहे.