साहित्यातील नोबेल पुरस्कार कादंबरीकार अब्दुल रझाक गुरनाह यांना जाहीर


स्टॉकहोम : नुकतेच वैद्यकशास्त्र, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कारांची घोषणा केल्यानंतर आज साहित्य क्षेत्रातील नोबेलची घोषणा करण्यात आली आहे. यंदाचा साहित्यातील नोबेल पुरस्कार कांदबरीकार अब्दुल रझाक गुरनाह जाहीर झाला आहे.

या पुरस्काराची रॉयल स्वीडीश अकॅडमीनं ट्विटरवर घोषणा करताना, अब्दुलर झाक गुरनाह यांनी त्यांच्या लेखनीतून संस्कृती, शरणार्थीचे भविष्य यासंदर्भात लिखाण केल्याचे म्हटले. लेखक अब्दुल रझाक गुरनाह यांनी त्यांच्या लिखाणातून पूर्व आफ्रिकेतील स्थिती, आखाती देशातील स्थिती मांडण्याचा प्रयत्न केला आहे. यापूर्वी, 2020 मध्ये साहित्य क्षेत्रातील नोबेल अमेरिकी कवियत्री लुईस ग्लूक यांना जाहीर झाला होता.