जलसंपदा विभाग उस्मानाबाद येथे सेवानिवृत्त अधिकाऱ्यांसाठी नोकरीची संधी


उस्मानाबाद : जलसंपदा विभाग उस्मानाबाद येथे लवकरच काही पदांसाठी नोकर भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना नुकतीच जारी करण्यात आली आहे. ही नोकर भरती अधिकारी/ सहाय्यक अभियंता श्रेणी – 2/ शाखा अभियंता/ कनिष्ठ अभियंता या पदांसाठी असणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

या पदांसाठी भरती
अधिकारी/ सहाय्यक अभियंता श्रेणी
शाखा अभियंता/ कनिष्ठ अभियंता
– एकूण जागा 03

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
अधिकारी/ सहाय्यक अभियंता श्रेणी – 2/ शाखा अभियंता/ कनिष्ठ अभियंता

सहाय्यक अभियंता श्रेणी – 2 किंवा शाखा अभियंता या पदांवरून सेवानिवृत्त झालेले उमेदवार या पदभरतीसाठी पात्र असणार आहेत. तसेच संबंधित पदानुसार उमेदवारांचे सजिक्षां झाले असणे आवश्यक आहे.

जलसंपदा विभगातील सिंचन आणि बांधकाम प्रकारासाठी संबंधित सर्वेक्षण, अन्वेषण, संकल्पन आणि प्रकल्प अहवाल तयार करणे. निविदा शर्ती, आर्थिक तरतूद, भूसंपादन, पुनर्वसन इत्यादी काम करण्याची जबाबदारी या अधिकाऱ्यावर असणार आहे.

उमेदवार ज्या पदासाठी अर्ज करत आहे त्या पदासाठी लागणार पात्रता उमेदवारांनी पूर्ण करणे आवश्यक आहे किंवा कमीतकमी तीन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.

ही नेमणूक फक्त वर्षभरासाठीच असणार आहे. उमेदवारांचे काम बघून नेमणूक वाढवण्यासंबंधी विचार केला जाणार आहे.

उमेदवार हे वयाच्या 65 वर्षांपर्यंतच कार्यरत राहू शकणार आहेत.

उमेदवारांची प्रकृती आणि शारीरिक स्वास्थ्य उत्तम असणे आवश्यक आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता
कार्यकारी अभियंता, उस्मानाबाद मध्यम प्रकल्प विभाग, उस्मानाबाद.

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – 20 ऑक्टोबर 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. तसेच या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा