
खास प्रौढांसाठी या कंपनीने आणले अल्कोहोल आईस्क्रीम
जगप्रसिद्ध आईसक्रीम कंपनी हेगनडॅझ आता खास प्रौढांसाठी आईस्क्रीम आणण्याच्या तयारीत असून दोन फ्लेवर मध्ये अल्कोहोल व आईस्क्रीम यांचे कॉम्बिनेशन असलेले हे खास स्वादाचे आईस्क्रीम पेश केले जात आहे. हेगनडॅझने प्रत्येक अॅडल्ट व्यक्ती किमान एकदा तरी या आईस्क्रीमचा स्वाद नक्की चाखेल असा दावा केला आहे. हे आईस्क्रीम तोंडात जाताच एक अलग झिंग आणि स्वाद जाणवेल मात्र त्याची नशा चढणार नाही असे कंपनीचे म्हणणे आहे.
प्रत्येक व्यक्तीला आईस्क्रीम आवडतेच पण प्रत्येकाचा स्वतःचा आवडीचा खास स्वाद असतो. डेली मेलच्या बातमीनुसार हेगनडॅझ दोन नवे फ्लेव्हर घेऊन येत आहे. याच महिन्यात कोझी कॉकटेल कलेक्शन वीक थीम खाली हे ओन्ली फॉर अॅडल्ट आईस्क्रीम लंडनच्या कॉकटेल वीक मध्ये सादर करणार आहे. रम सॉल्टेड कॅरामल आणि आयरिश व्हिस्की अँड चॉकलेट वॉफेल असे हे दोन स्वाद आहेत.
या आईस्क्रीमच्या सेवनाने मन हलके होईल पण नशा येणार नाही. यात अल्कोहोलचे प्रमाण अगदी कमी आहे. याच्या एका बॉक्स साठी ५०० रुपये मोजावे लागतील पण छोट्या कप मधून सुद्धा ते मिळू शकेल. २०२० मध्ये कंपनीने स्पिरीट कलेक्शन नावाने सादर केलेल्या आईस्क्रीमला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. या कंपनीची स्थापना रुबेन व रोज मॅटस यांनी १९६० मध्ये न्युयॉर्क येथे केली. आज जगातील टॉप ब्रांड अशी कंपनीची ओळख आहे.
